
अंबडमध्ये वाहतूक नियमभंगावर पोलिसांची मोठी कारवाई
बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शाह
जालना): पोलीस ठाणे अंबड आणि ग्रामीण वाहतूक शाखा जालना यांच्या संयुक्त कारवाईत अंबड शहर व परिसरात वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनधारकांवर मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली.ही मोहीम दिनांक ०१ नोव्हेंबर २०२५ रोजी राबविण्यात आली. यावेळी फॅन्सी नंबर प्लेट, तुटलेल्या नंबर प्लेट, काळ्या फिल्म/शेड्स तसेच १२ वर्षांवरील जुनी वाहने चालविणारे नागरिक यांच्यासह एकूण ६१ वाहनधारकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल ₹६३,५०० इतका दंड आकारण्यात आला.पुढील काळातही अशी कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, नागरिकांनी आपल्या वाहनांवरील फॅन्सी नंबर प्लेट व काळ्या फिल्म तत्काळ काढून टाकाव्यात, तसेच वाहन चालविताना लायसन्स आणि कागदपत्रे जवळ बाळगावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश साबळे आणि उपविभागीय अधिकारी सिद्धेश्वर भुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संतोष घोडे यांच्या नेतृत्वात अंबड पोलिस दल व ग्रामीण वाहतूक शाखा जालना यांच्या संयुक्त पथकाने राबवली.ही कारवाई वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना इशारा देणारी ठरली असून, पोलिसांच्या या संयुक्त मोहिमेचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
