
बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शहा
फलटण, जिल्हा सातारा उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांची आत्महत्या ही राज्यासाठी अत्यंत धक्कादायक घटना आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी तळहातावर लिहिलेल्या मजकुरानुसार पोलीस निरीक्षक गोपाल बदने याच्याकडून बलात्कार व इतरांकडून मानसिक-शारीरिक छळ झाल्याचे गंभीर आरोप आहेत. महिलांना संरक्षण देणाऱ्या पोलीस यंत्रणेवरच असे आरोप होणे ही कायदा-सुव्यवस्थेसाठी चिंताजनक बाब आहे. डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळावा तसेच या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होऊन दोषींना कडक शिक्षा मिळावी यासाठी आज मा. बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले ! यावेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंदाताई बढे, उपजिल्हाप्रमुख प्रतिक्षाताई पिंपळे, लोणार तालुकाप्रमुख तारामती जायभाये, मोताळा तालुकाप्रमुख कल्पनाताई पुरी, शालिनीताई मोरे शहरप्रमुख लोणार, शोभाताई पोघे शाखाप्रमुख, नंदताई नागरे, गोदावरीताई सोनुने, आशाबाई कांगणे, सरूबाई सोनुने, विमलबाई कारंदे, सुनिताताई गायकवाड, रत्नाताई शेळके, अनिताताई गायकवाड, स्मिताताई वराडे, शितलताई सुरडकर, सपनाताई इंगळे, वंदनाताई मेढे, श्रध्दाताई आराख, कविताताई भागीले, संगीताताई सोनुने, सुवर्णाताई जाधव, बेबीताई परिहार, सुनिताताई सुरडकर, शारदाताई दाभाडे, सरलाताई चौथनकर, सविताताई राऊत, आरतीताई जाधव, सुनिताताई दराखे, सोनालीताई वाघ, मिनाताई इंगळे यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्य
