पोलीस नाकाबंदीत दारूची अवैध वाहतूक उघड; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

पोलीस नाकाबंदीत दारूची अवैध वाहतूक उघड; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शहा

रायपुर (बुलढाणा): रायपुर पोलीस स्टेशनसमोर नाकाबंदी दरम्यान संशयास्पद रित्या मोटारसायकलवर देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (अ) (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, २५ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री अंदाजे २०.३० वाजता (८:३०) पोका/अजरोदीन मोबीनोदीन काझी (ब.न. १७) आणि त्यांच्यासोबत सफौ/७२९ बारवाल, पोका/२६०३ घेवंदे, पोका/२१६० अख्तर, पोका/१४३१ जवादे हे रायपुर पोलीस स्टेशनसमोर नाकाबंदी करून वाहने तपासत असताना एका मोटारसायकलवर (क्रमांक एम एम २८ ए आर ८९४१) दोन इसम संशयास्पद पोतडी घेऊन जात असताना दिसले.पोलिसांनी त्यांना थांबवून नावे विचारली असता चालकाने ज्ञानेश्वर रामराव अवघडे (वय ४८, रा. रायपुर, ता.जि. बुलढाणा) आणि मागे बसलेल्या व्यक्तीने रामेश्वर रामराव अवघडे (वय ४१, रा. रायपुर, ता.जि. बुलढाणा) अशी नावे सांगितली. त्यांच्याकडील पोतडीबद्दल विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.जप्त केलेला मुद्देमाल:संशय बळावल्याने पोलिसांनी रस्त्यावरील दोन पंचांना बोलावून त्यांच्या समक्ष पोतडीची तपासणी केली. तपासणी दरम्यान पोतडीमध्ये खालीलप्रमाणे दारूचा साठा आढळून आला:कोकण देशी दारू संत्रा ९९९ कंपनीच्या सीलबंद १८० एमएलच्या ३५ नग शिश्या (किंमत अंदाजे रु. २८००/-)कोकण देशी दारू संत्रा ९९९ कंपनीच्या सीलबंद ९० एमएलच्या ३५ नग शिश्या (किंमत अंदाजे रु. १४००/-)एकूण प्रोहिबिशन मालाची किंमत: रु. ४२००/-गुन्ह्यात वापरलेली जुनी मोटारसायकल (एचएफ डिलक्स): किंमत अंदाजे रु. ३५०००/-एकूण जप्त केलेला मुद्देमाल: रु. ३९२००/-हा संपूर्ण मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला असून, पुढील तपासणीसाठी (C.A. तपासणी) दारूच्या ९० मिली आणि १८० मिलीच्या प्रत्येकी एक सीलबंद शिशी नमुना म्हणून बाजूला काढून त्यावर पंचांच्या सह्यांचे लेबल लावून सील करण्यात आली आहे.दोन्ही आरोपी ज्ञानेश्वर अवघडे आणि रामेश्वर अवघडे यांच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम ६५ (अ) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना न्यायालयात हजर राहण्याबाबत समजपत्र (नोटीस) देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *