पोहायला गेलेल्या कैलास चा मृतदेह अखेर २४ तासांनी सापडला

पोहायला गेलेल्या कैलास चा मृतदेह अखेर २४ तासांनी सापडला..

बुलढाणा जिल्हा तालुका प्रतिनिधी जावेद शाह

जळगाव जामोद तालुक्यातील निभोरा बुद्रुक येथील २४ वर्षीय कैलास खंडारे हा युवक आपल्या ८ मित्रांसह गोराडा धरणात पोहायला गेला होता.गोराळा धरणात पोहताना खोलवर गेला सोबत असलेले मित्रांना पोहता येत नव्हते म्हणून काठावरच अंघोळ करत होते.कैलास धरणाच्या पाण्यात बुडत असल्याचे लक्षात आल्यावर त्याला वाचवणे मित्रांना जमले नाही त्यामुळे कैलास धरणात दिनांक २२ ऑक्टोबर रोजी बुडाला होता. दिनांक २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ओम साई फाउंडेशन नांदुरा, खामगांव, बुलढाणा रेस्कू टीमने शोध घेतला असता गोराडा धरणात बुडालेल्या कैलास खंडारे या तरूणाचा मृतदेह अखेर २४ तासानंतर मिळून आला.घटनास्थळी तहसीलचे कर्मचारी, पोलीस प्रशासनातील सुनगाव बीटचे जमदार इरफान शेख, संदीप रिंढे, पोलीस पाटील पती मनीष तडवी यांचे सह सुनगाव, निंभोरा बुद्रुक व परिसरातील गावकरी धरणावर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *