वारंवार निवेदनांना अखेर मिळाला प्रतिसाद! रायपूरकरांचा सडकांवर संताप उफाळला

वारंवार निवेदनांना अखेर मिळाला प्रतिसाद! रायपूरकरांचा सडकांवर संताप उफाळला

रायपूर प्रतिनिधी जावेद शहा

रायपूर व पंचक्रोशीतील गावातील नागरिकांचे हाल सोसणारा रस्त्याचा प्रश्न अखेर उफाळून आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांचे हाल होत असताना प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत होती. अखेर वारंवार निवेदनं देऊन थकलेल्या रायपूरकरांनी आज सडकांवर उतरून संताप व्यक्त केला.यात फारुख सेठ सौदागर,बालाप्रसाद जयस्वाल,आभीमान घोलप,निलेश राजपूत,सुनिल देशमाने, ग्राम सेवक गणेश पाहेघन,रमेश देशमुख,शमीम सौदागर,मो सज्जाद, गजानन खिल्लारे, सदानंद पाटील, सुभाष आप्पा देशमाने, ज्ञानेश्वर अवघडे व बरेच गावकरी उपस्थित होते.संतप्त आंदोलनाची दखल घेत कार्यकारी अभियंता गणेश भागुरे आणि इंजिनिअर सचिन वाघ यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत आंदोलक नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी फक्त 10 दिवसांत रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन देत नागरिकांना दिलासा दिला.नागरिकांनी प्रशासनाकडून मिळालेल्या या आश्वासनाचे स्वागत केले असले, तरी “आता आमचा संयम संपला आहे. दिलेल्या मुदतीत काम पूर्ण झाले नाही, तर आणखी तीव्र आंदोलन छेडू,” असा इशारा देत प्रशासनास सावध केले.लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकार्‍यांवर कार्यवाहीची मागणी करत नागरिकांनी “आमचा रस्ता आम्हालाच का मिळत नाही?” असा संतप्त सवाल उपस्थित केला. आगामी दिवाळीपूर्वी रस्ता दुरुस्त न झाल्यास परिस्थिती आणखी बिकट होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *