सुनगाव ग्रामपंचायत मध्ये कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार पणामुळे गावकरी त्रस्त

सुनगाव ग्रामपंचायत मध्ये कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार पणामुळे गावकरी त्रस्त

जळगाव जामोद प्रतिनिधी

जळगाव जामोद तालुक्यातील सर्वात चर्चेत असलेली ग्रामपंचायत असुन कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार वागणूकीमुळे सुनगांव येथील नागरिक त्रस्त झाले आहेत येथील ग्रामपंचायत कर्मचारी हे नेहमीच हस्तलिखित दाखल्यामध्ये चुका करत असून त्याचा सामान्य नागरिकांना भुर्दंड व त्रास होत आहे तसेच गाव नमुना 8 व फेरफार नोंदी चुकीच्या पद्धतीने केल्या आहेत सन 2015 ते 2020 मधील कर आकारणी नोंद वही तील नमुना 8 मध्ये गैरवापर केला आहे सदर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मागील नोंदवहीतील उतारे समोर न घेता 2020 ते 2025 मध्ये त्यांनी त्यांच्या मताने नमुना आठव नोंदी केलेले आहेत अशा बऱ्याचशा तक्रारी सुनगाव येथील नागरिकांनी उपस्थित केले आहेत तसेच जन्म मृत्यू च्या दाखल्यामध्ये नोंदणी तारीख व दाखला दिलेली तारीख यामध्ये बरीचश्या प्रकारे तफावत आढळून आली आहे सदर ग्रामपंचायत कर्मचारी हे जबाबदारपणे ग्रामपंचायत रेकॉर्ड तसेच नागरिकांना दाखले देताना कोणत्याही प्रकारचे भान न ठेवता चुकीचे दाखले देत आहे आज रोजी सदर ग्रामपंचायत मध्ये सुनगाव मधील जबाबदार नागरिकांनी सदर ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामसेवक यांना जाब विचारला असता त्यांच्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आज रोजी चांगलाच राडा झाल्याचे दिसून आले ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर सरपंच रामेश्वर अंबडकार व ग्रामसेवक हितेंद्र जोशी यांचे नियंत्रण नसल्याचे उघड केस येत आहे आहे सदर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर पंचायत समिती गटविकास अधिकारी वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात याकडे सुनगांववाशियांचे लक्ष लागले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *