
भारत संचार निगम लिमिटेड बुलढाणा स्थित खामगाव दूरसंचार महाप्रबंधक कार्यालयात पंचविसावा दूरसंचार वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा
खामगाव प्रतिनिधी
भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल देशभरात 25 वा वर्धापन दिन मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे तसेच बुलढाणा दूर संचार जिल्हा प्रबंधक कार्यालयात आज दिनांक 01/10/2025 रोजी जिल्ह्याचे सहाय्यक प्रबंधक श्री एन आर ठोंबरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख अतिथी श्री प्रभुणे सर मुख्याध्यापक शासकीय तंत्रनिकेतन खामगाव तसेच श्री इसोकार साहेब साहेब प्रबंधक श्री खिल्लारे साहेब उपविभागीय अभियंता श्री मोसिन साहेब , श्री राजगुरे साहेब यांच्या उपस्थित केक कापून साजरा करण्यात आला.मागील आठवड्यापासून जिल्हा दूरसंचार विभागामार्फत विविध कला स्पर्धा निबंध कार्यक्रमाचे आयोजन सुरू होते त्यात बक्षीस वितरण विविध स्पर्धकांना देऊन गौरव करण्यात आला मागील आठवड्यात देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांनी देशभरात स्वदेशी तंत्रज्ञान बनविलेले फोरजी चार लाख टावर चा शुभ हस्ते समारंभ करण्यात आला हे विशेष आज बीएसएनएलचे कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत जाडे पसरले असून देशात एकमेव सरकारी दुरसंचार कंपनी असून आज शहरी व ग्रामीण भागात सेवा देण्यात तत्प्रार असून तोट्यात जरी आहे स्पर्धेच्या युगात भक्कम टिकून आहे जनतेच्या सेवेसाठी विश्वासामुळे आज बीएसएनएल 25 वे वर्षे वर्धापन दिन साजरा करण्यात आहे याचे सर्व श्रेय फक्त देशाच्या जनतेला समर्पित आहे आज खामगाव शहरात वर्धापन दिनानिमित्त रॅली काढून सर्व जिल्हाभरातील कर्मचारी सेवा नियुक्त कर्मचारी जिल्ह्यातील मोबाईल सिम कार्ड विक्रेते. टीआयपी व कंत्राटि वर्कर बीएसएनएल युनियन पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरता श्री पांडव साहेब श्री इंगळे साहेब श्री दिघोळे साहेब श्री रणधीर साहेब श्री गायकी साहेब श्री मानकर साहेब श्री विजय कांबळे साहेब श्री नकुल कुलकर्णी साहेब श्री नेमाने साहेब श्री केवल पाटील साहेब श्री वांजोळ साहेब श्री चितोडे साहेब श्री तेलकर साहेब गजानन झाल्टे अजय पवार बापू सुधाकर जाधव यांनी परिश्रम घेतले
