
व्याघ्रा नदी पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या दोन्ही मुलांच्या परिवाराला नैसर्गिक आपत्तीअंतर्गत शासकीय अर्थसहाय्य मिळावे अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर तालुक्यातील :- व्याघ्रा नदी पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या दोन्ही मुलांच्या परिवाराला नैसर्गिक आपत्तीअंतर्गत शासकीय अर्थसहाय्य मिळावे अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे यांनी आज १ ऑक्टोंबर रोजी आमदार चैनसुख संचेती व तहसीलदार राहुल तायडे यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे. मौजे दसरखेड येथील शुभम राजु दवंगे वय – १६ वर्षे व सोहम वासुदेव सोनोन वय – १५ वर्ष हि दोघं मुले शिवनी रस्त्यावरील निंबोळी गावानजीक असलेल्या केसोबा मंदिर परिसरातील व्याघ्रा नदी पात्रात पुराच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने त्यांचा पाण्यात बुडुन दुर्देवी मृत्यु झाला. ही घटना २८ सप्टेंबर रोजी घडली. मुलं लहान असल्याने त्यांना कसलीही समज नव्हती. नदीपात्रातील खडकावरुन पाय निसटतात किंवा पुराचे पाणी त्यांना ओढुन नेवू शकते किंवा ते पाण्याच्या प्रवाहात बुडु शकतात याची त्यांना जाणीव नव्हती. त्यामुळेच त्यांचा दुर्देवी मृत्यु घडला. दुर्देवी घटनेनंतर दि. २९ सप्टेंबर रोजी केंद्रीय आयुष मंत्री, ना. प्रतापराव जाधव तर ३० सप्टेंबर रोजी आमदार चैनसुख संचेती यांनी दसरखेड येथे सात्वंनपर भेटी दरम्यान या दोन्ही परिवारांना नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शासनाकडुन आर्थिक सहाय्य मिळावे या अनुषंगाने तहसीलदार राहुल तायडे यांना सुचित केले आहे. त्या धर्तीवर तहसीलदार राहुल तायडे यांनी पुढील प्रक्रीया करुन सहकार्य करावे ही विनंती. तरी या प्रकरणी नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शासनाकडुन दोन्ही मृतक मुलांच्या परिवाराला आर्थिक सहाय्य मिळावे असा सविनय निवेदनाद्वारे सादर केला असून या निवेदनाची प्रतिलिपी केंद्रीय आयुष मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांना सुद्धा माहिती व उचित कारवाईसाठी पाठविण्यात आली आहे. चौकट: दसरखेडला सांत्वन पर भेटी दरम्यान तहसीलदार राहुल तायडे व कृषी विभागाचे अधिकारी सोबत होते. त्यावेळी आम्ही या दोन्ही अधिकाऱ्यांना दुर्दैवी घटनेत मृत पावलेल्या दोन्ही मुलांच्या परिवारांना नैसर्गिक आपत्ती अंतर्गत आर्थिक सहाय्य मिळावे या अनुषंगाने सुचित केले आहे किंबहुना त्या संदर्भात प्रस्ताव तयार करून वरिष्ठांना पाठविण्याबाबत सुद्धा तहसीलदार यांना सांगितले आहे अशी माहिती आमदार चैनसुख संचेती यांनी विजय साठे यांना देत याप्रकरणी आपण निश्चितच पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.
