
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा वर्धापनदिन उत्साहात संपन्न.
जळगाव जामोद प्रतिनिधी
राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या 31 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी समाज कल्याण मंत्री मा. बबनरावजी घोलप साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार बुधवार दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9:00 वाजता ग्रामीण रुग्णालय जळगाव (जामोद ), जि बुलढाणा येथे रुग्णांना बिस्किट व फळ वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष ज्ञानदेवराव इंगळे, जिल्हा सचिव सुखदेवराव थोटे, जिल्हा सल्लागार ॲड. रविंद्रजी काकडे साहेब , जिल्हा संघटक रामदासजी पिंजरकर, जळगांव (जामोद ) तालुका अध्यक्ष नागेश भटकर, संग्रामपूर तालुका अध्यक्ष अरुण निंबोळकर, युवा आघाडी जिल्हा सचिव संदीप इंगळे , रेशीमगाठी विवाह मंडळाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्राचार्य गजाननराव दांडगे , गुरु रविदास सत्यशोधक समाजाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष रवींद्र शेगोकार , गुरु रविदास महाराज जयंती उत्सव समिती जळगाव (जामोद) चे अध्यक्ष पांडुरंगजी गवई, राष्ट्रीय चर्मकार महासंघ महिला आघाडी जिल्हा सल्लागार सौ वर्षा ज्ञानदेव इंगळे , जळगाव (जामोद) तालुका अध्यक्ष सौ रुक्मिणी रविंद्रजी काकडे , तालुका उपाध्यक्ष सौ रेखा गजाननराव दांडगे, तालुका सचिव सौ वंदना संतोष भटकर , तालुका सहप्रसिद्धीप्रमुख श्रीमती संगीता पद्मने , सौ पूनम संदीप इंगळे, चि विनय संदिप इंगळे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
