
चिखली विधानसभा कार्यकर्ता बैठक व नियुक्ती पत्र वाटप उत्साहात संपन्
बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शहा
आज अनुराधा फार्मसी कॉलेज साकेगाव रोड, चिखली येथील सभागृहात चिखली विधानसभा मतदार संघाचे प्रभारी तसेच बुलढाणा जिल्हा काँग्रेस चे निरीक्षक मा. राजेंद्रजी राख साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षाची बैठक तसेच नवीन कार्यकारिणीला नियुक्ती पत्र देऊन पदवाटप कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष रामभाऊ जाधव, शहर अध्यक्ष राहुल सडवतकर, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास वाघमारे, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष रिक्की काकडे, तालुका किसान सेल अध्यक्ष समाधान आकाळ, शहर किसान सेल अध्यक्ष मिलिंद पालवे, तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष गाजी बाबा, शहर अल्पसंख्याक अध्यक्ष खलील बागवान, तालुका सेवादल अध्यक्ष रामभाऊ भुसारी, पंचायत राज संघटना अध्यक्ष गणेश जवंजाळ, शहर युवक अल्पसंख्याक अध्यक्ष बबलु शेख, तालुका विद्यार्थी सेल अध्यक्ष गोपाल म्हस्के, शहर सोशल मीडिया प्रमुख कैलास जंगले आदी पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकारिणी जाहीर करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले.बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष मजबूत उभा राहण्यासाठी धोरण आखणी, बूथ लेव्हल संघटनात्मक बांधणी आणि कार्यकर्त्यांनी घराघरात पोहोचून जनतेचे प्रश्न सोडविण्याची दिशा ठरविण्यात आली.यावेळी जिल्हा निरीक्षकांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत “काँग्रेस पक्षाची ताकद म्हणजे कार्यकर्ते असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनतेच्या पाठबळावर आपण नक्कीच यश संपादन करू” असा विश्वास व्यक्त केला.
