आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी निवडणूक व दसरा मेळाव्याच्या भव्य नियोजन बैठकीचे आयोजन

शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी निवडणूक व दसरा मेळाव्याच्या भव्य नियोजन बैठकीचे आयोजन

बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शहा

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये “माझ्या जीवाचं रान करीन पण माझा कार्यकर्ता विजयी केल्याशिवाय राहणार नाही…आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड या धाड नाका, ओंकार लॉन्स येथे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका आणि दसरा मेळावा यासाठीची भव्य नियोजन बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली…बैठकीची सुरुवात अत्यंत भावनिक वातावरणात झाली. मा. श्री राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्या मातोश्री स्व. प्रभावती काकू शिंगणे तसेच अंभोडा येथील माजी सरपंच स्व. रमेश त्र्यंबक तायडे यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यकर्त्यांनी आपल्या मनातील कृतज्ञता आणि आदर व्यक्त केला…या बैठकीला शिवसेना, किसान सेना, युवासेना, वाहतूक सेना, अल्पसंख्यांक सेना, सोशल मीडिया टीम, महिला आघाडी, अंगीकृत संघटना, बूथ प्रमुख, शिवदूत प्रमुख, गणप्रमुख, शाखाप्रमुख, आजी-माजी पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती….यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये मा. नगराध्यक्ष सौ. पूजाताई संजय गायकवाड, महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारिणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, धर्मवीर युथ फाउंडेशन अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, मा. नगराध्यक्ष श्री. विठ्ठलराव येवले, किसान सेना जिल्हाप्रमुख संदीप गायकवाड, उपजिल्हाप्रमुख भोजराज पाटील, शरदचंद्र पाटील, निलेश गुजर, बाळासाहेब नारखेडे, शिवसेना नेते विजय अंभोरे, गणेशसिंग राजपूत, तालुकाप्रमुख धनंजय बारोटे, शहरप्रमुख गजेंद्र दांदडे, गजानन लांडे पाटील, आशिषबाबा खरात, अशोक इंगळे, मारुती कोल्हे, अमोल शिंदे,संदीप पालकर, मयूर पडोळ, श्रीकांत गायकवाड,मोताळा युवासेना शहर प्रमुख सचिन हिरोळे, निरंजन वाढे, दादाराव महाले, आशिष जाधव,युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रवीण निमकर्डे, श्रीकांत ऊर्फ मुन्ना जाधव,मोहम्मद ठेकिया, गजानन मुठ्ठे, सौ. अनुजाताई सावळे, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख सौ. ज्योतीताई सानप, तालुका प्रमुख सौ. वर्षाताई तायडे, सौ. नीताताई पाटील, प्रमिलाताई गवई,शहर महिला प्रमुख सौ. वैशालीताई ठाकरे, युवती महिला शहर प्रमुख रामेश्वरीताई चव्हाण, शहर महिला आघाडी कार्याध्यक्ष शुभांगीताई भोंडे, कुवरसिंग राजपूत,सरपंच अनिल पाटील,अनंता लहासे,आदी मान्यवर उपस्थित होते…. आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांनी मार्गदर्शन करताना म्हटले आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका या शिवसेनेच्या विजयासाठी निर्णायक आहेत. प्रत्येक बूथ, प्रत्येक गावात कार्यकर्त्यांनी सातत्याने जनतेशी संपर्क ठेवत शिवसेनेची विचारधारा पोहोचवावी.

  • दसरा मेळावा हा शिवसेनेच्या शक्तीचा आणि परंपरेचा उत्सव असून, यात प्रत्येक कार्यकर्त्याने उत्साहाने सहभागी व्हावे.एकजूट, निष्ठा आणि समर्पण या आधारावर पक्षाचा झेंडा बुलंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले मतदार संघातील प्रत्येक गावामध्ये अध्यावत अभ्यासिका देणार..बंजारा समाज आणि धनगर समाजाच्या आरक्षणाला सर्वांनी एकत्र पाठिंबा द्यावा..बुलढाणा मतदारसंघांमध्ये 50,000 पेक्षा अधिक सदस्यांची नोंदणी आपल्याला येणाऱ्या काळात करायची आहे..युतीवर भाष्य करताना आम्ही युतीसाठी सकारात्मक असून जी युती भाजपा इतर ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये करेल तीच युती बुलढाणा मतदार संघामध्ये झाली पाहिजे, तेव्हाच येणाऱ्या निवडणुकांमध्ये प्रामाणिकपणे काम होईल..!
  • हा लढा माझा नसून हा प्रत्येक कार्यकर्त्याचा लढा आहे, यापुढे कोणत्याच निवडणुकीमध्ये गटबाजी होणार नाही..!यावेळी धर्मवीर युथ फाउंडेशन अध्यक्ष पृथ्वीराज गायकवाड यांच्या उत्स्फूर्त भाषणाने उपस्थितांचे मनोबल उंचावले. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आपल्या ताकदीची आणि निष्ठेची प्रचिती दिली.ही बैठक एकजूट, समर्पण आणि श्रद्धेचे प्रतीक ठरली. कार्यकर्त्यांनी शिवसेना परिवाराची ताकद नव्या उमेदीने दाखवत “आपला आवाज – आपली शिवसेना” हे ब्रीद पुन्हा अधोरेखित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *