तायक्वांडो स्पर्धेत जिजाऊ ज्ञान मंदिर पळसखेड भटचे 15 विद्यार्थी विभागस्तरावर

तायक्वांडो स्पर्धेत जिजाऊ ज्ञान मंदिर पळसखेड भटचे 15 विद्यार्थी विभागस्तरावर

बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शहा

शा.प्र दि. 20 सप्टेंबर राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्यु क्रॉप सायन्स कॉलेज पळसखेड भट चे विद्यार्थी बुलढाणा येथे झालेल्या जिल्हास्तरीय तायक्वांडो क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. त्यात 15 विद्यार्थ्यांनी विजय मिळवत त्यांची विभागीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सविस्तर वृत्त असे की, बुलढाणा येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय तायक्वांडो क्रीडा स्पर्धा दि. 19 सप्टेंबर ला होत्या त्यात जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर येथील 15 विद्यार्थ्यांनी विजय मिळवत विभागस्तरावर झेप घेतली. यात अंडर 19 मध्ये शिवम उबाळे, सुरज देशमुख, समता जाधव, सानिका धनवे, शिवानी खंडागळे, पायल चिकटे, जानवी भिवटे, सृष्टी मोरे यांनी विजय मिळवला तर 17 वर्षे वयोगटात सई सिरसाट, हर्षल बिलारी, सोहम लोखंडे, धनंजय सोनाळकर, भुषण टेकाळे यांनी विजय मिळवला तर 14 वर्ष वयोगटात रुद्र पांडे, नैतीक कव्हाळ या विद्यार्थ्यांनी विजय मिळवत, सर्वांची विभागीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांनी प्रत्येक सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करीत प्रतिस्पर्ध्याला मात देत जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकली. या विजयामुळे शाळेचे विद्यार्थी विभागस्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या सर्वांचे अभिनंदन करत संस्था अध्यक्ष संदीप दादा शेळके म्हणाले की, जिजाऊ ज्ञान मंदिर पळसखेड भट चे विद्यार्थी गेल्या काही वर्षांपासून चमकदार खेळी करत आहेत. या अगोदरही शाळेचे 27 विद्यार्थी राज्यावर व 2 देशपातळीवर सुद्धा गेलेले आहेत. या विजयामुळे आणखी एक सन्मान शाळेला प्राप्त झाला आहे. शिक्षणाबरोबरच शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी खेळ खुप महत्वाचे आहे. खेळामुळे सर्वांगीण विकास साधण्यासाठी मदत होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जिजाऊ ज्ञान मंदिर शाळेच्या माध्यमातून आपण सतत प्रयत्नशील आहोत. येत्या काळात हे संकुल एक मोठं क्रिडा केंद्र (स्पोर्ट्स हब) होईल यात तिळमात्र शंका नाही. आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधिल कला व क्रिडा गुण ओळखून त्यांना विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी निश्चित कटीबद्ध आहोत. सरावा सोबतच विद्यार्थ्यांनी (डाएट) सकस आहाराकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी या विजयाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या विजयामागे शाळेचे प्रशिक्षक भुषण सिरसाट यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *