तालूकास्तरीय शालेय योगा स्पर्धेत जिजाऊ ज्ञान मंदीर चे विद्यार्थी विजयी

तालूकास्तरीय शालेय योगा स्पर्धेत जिजाऊ ज्ञान मंदीर चे विद्यार्थी विजयी

बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शहा

दि. 05 सप्टेंबर राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पळसखेड भट येथील विद्यार्थ्यांचा चमू 4 सप्टेंबर रोजी बुलढाणा येथे झालेल्या तालुकास्तरीय योगा स्पर्धेत सहभागी झाला होता. यात 6 विद्यार्थी विजयी झाले. सविस्तर वृत्त असे की, यावेळी प्रथमच शाळेने नियुक्त केलेल्या योग शिक्षीकेच्या माध्यमातून सराव करीत शाळेतील विद्यार्थी तालूकास्तरीय योगा स्पर्धेतील पारंपारिक योगा व कलात्मक योगा या प्रकारात शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यात कलात्मक योगा या प्रकारात प्रेरणा बिलारी, श्रेयांशी सिरसाट, अमृता सिरसाट, अश्विन देशमाने व समर्थ पिंपळे या 5 विद्यार्थ्यांनी प्रथम येतं विजय मिळवला. तर पारंपारिक योगा या प्रकारात अक्षरा धनावत हीने विजय मिळवला या विजयाबरोबरच सर्वांची जिल्हास्तरीय योगा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विजयामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे अशी प्रतिक्रिया संस्था अध्यक्ष मा संदीप दादा शेळके यांनी दिली व पुढील स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या विजयासाठी शाळेच्या योगा शिक्षीका प्राजक्ता चौधरी व क्रिडा शिक्षक भुषण सिरसाट यांनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *