
सैलानी येथे श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शहा
सैलानी येथे वारकरी संप्रदयाचे थोर संत व नाभिक समाजाच्या आराध्य दैवत श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन तथा त्यांच्या चरणी त्रिवार वंदन करण्यात आले. नाभिक समाजाचे आराध्य दैवत वारकरी संप्रदायातील संत सेना महाराज यांची

पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन तथा त्यांच्या चरणी त्रिवार वंदन करण्यात आले. सैलानी येथील नाभिक समाजाच्या वतीने भगवान बिडवे,विजय पाटील, गजानन पाटील

(सामाजिक कार्यकर्ते),विनोद सुरोशे,शाम झगरे, शंकर सुरोशे, दत्ता बिडवे,गोपाल बिडवे विष्णू बिडवे, निलेश सुरोशे यांच्या शुभ हस्ते प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.
व समाजातील मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
