
राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरादचंद्र पवार ) पक्ष जळगाव जामोद तालुक्याचे वतीने जाहिर पाठिंबा
जळगाव जामोद प्रतिनिधी
गौलखेड येथील आंदोलनकर्ता विनोद पवार या युवकाने दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी आडोळ गांवठाण पोच रस्त्यासन्दर्भत चालू असलेल्या जलसमाधी आंदोलना दरम्यान जलसमाधी घेऊन जीव दिला. हा प्रशासनाच्या हलगर्जीपनामुळे गेलेला बळी आहे. आज दिनांक 19 ऑगस्ट 2025 वंचित बहुजन आघाड़ीच्या स्व. विनोद पवार यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी व कुटुंबीयांनी केलेल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी करण्यात येत असलेल्या आंदोलनाला आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरादचंद्र पवार ) पक्ष जळगाव जामोद तालुक्याचे वतीने जाहिर पाठिंबा देण्यात आला.यावेळी तालुकाध्यक्ष प्रमोद सपकाळ, ता. कार्याध्यक्ष महादेव भालतडक, महिला तालुकाध्यक्ष वर्षाताई वाघ,नितीन उगले, आशिष वायझोडे, दत्ता डीवरे,विठ्ठल घुले, सुहास वाघ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
