
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय बुलडाणा तर्फे जनतेस आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणा
बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शहा
दिनांक १६.०८.२०२५ रोजी पासुन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय बुलडाणा तर्फे जनतेस आवाहन करण्यात येते की, जनतेमध्ये भ्रष्टाचार विरोधी जनजागृती करण्याचे उद्देशाने भ्रष्टाचारासंबधी माहीती असल्यास अगर लाच मागणा-या शासकीय अधिकारी व कर्मचारी लोकसेवकांबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाशी त्वरीत संपर्क होणेकरीता नविन मोबाईल/व्हाट्स अॅप क्रमांक ९४०५०९१०६४ सुरु करण्यात आला आहे. तरी लाच मागणा-या शासकीय अधिकारी व कर्मचारी लोकसेवकांबद्दल तकार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधरत विभागाच्या कार्यालयाशी त्वरीत संपक साधावा.कोणाविरुध्द तक्रार करता येते- महसुल विभाग, नगर परिषद, जिल्हा परिषद,ग्रामपंचायत, तहसिल कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस विभाग, विद्युत महामंडळ, व्यवसायकर विभाग, विकीकर विभाग, नगर रचना विभाग, जिल्हा उपनिबंधक विभाग, दुय्यम निबंधक व उपनिबंधक विभाग, कोषागार विभाग, सहकारी पतसंस्था राज्य परिवहन महामंडळ, उपप्रादेशिक परिवहन विभाग, शासनाकडुन अनुदान मिळणा-या सर्व संस्था व शैक्षणिक संस्था सर्व शासकीय कार्यालय तसेच अन्य सर्व महामंडळे येथील सर्व सरकारी अधिकारी व कर्मचारी तसेच सरकारी नोकरांसाठी लाच मागणारे सर्व एजंट/मध्यस्थ.बे-हिशोबी संपत्ती भ्रष्टाचारच्या मार्गाने अधिकारी, कर्मचारी यांनी बेहिशोबी संपत्ती जमविल्याबाबत तकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिल्यानंतर त्यातील सत्यता व विश्वासर्हता पडताळल्यानंतर कार्यवाही करण्यात येते, तक्रार कर्त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येते.पोलीस उपअधिक्षक, लाचलुचपत प्रबिंधक विभाग, बुलडाणाकार्यालयीन दुरध्वनी कमांक ०७२६२-२४२५४८हेल्पलाईन क्रमांक १०६४मो.नं. ९४०५०९१०६४उपअधिक्षक अन्( भागोजी चोरमले ) पोलीस उप अधिक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो, बुलडाणा
