जळगाव जामोद तालुक्यामधील सातपुडा पर्वतामध्ये मेंढी चराई मात्र वनविभागाचे दुर्लक्ष

जळगाव जामोद तालुक्यामधील सातपुडा पर्वतामध्ये मेंढी चराई मात्र वन विभागाचे दुर्लक्ष भाग एक

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे

जळगाव जामोद तालुक्यामधील सातपुडा पर्वत हे अतिशय वनस्पती निर्मिती असणारे जंगल आहे या जंगलामध्ये हजारो प्रकारच्या वनस्पती निर्माण होतात तसेच या वनस्पतीचे काही भागांमध्ये संरक्षण करण्यात येते परंतु दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या वनस्पतीचे संरक्षण करण्यासाठी काही सातपुडा प्रेमी ही वाचू शकत नाही कारण पावसाळा सुरू असताना हजारो वनस्पती सातपुडा पर्वतामध्ये जन्माला येतात आणि त्यामध्ये मेंढी चरई होत असते मेंढी चरही हे मध्य प्रदेशातून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात येते त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी त्यांना महाराष्ट्राच्या बॉण्ड्री वरती असलेला वनविभागाचा नाका हा पार करावा लागतो परंतु हा नाका पार करतानाही त्यांना कोणती अडचण येत नाही व जळगाव जा महाराष्ट्र ते मध्यप्रदेशची बॉण्ड्री आहे यामध्ये असलेले सातपुडा पर्वतामध्ये यांचे हजारो झोपड्या करून राहतात आहे त्यामध्ये प्रत्येक सातपुडा पर्वता लागून असलेले जंगलामध्ये सातपुडा पर्वतामध्ये अनेक गावी लागतात त्यामध्ये जामोद राऊंड जळगाव जा राऊंड, खांडवी राऊंड मध्ये सातपुडा पर्वतामध्ये लागून असलेले या गावांमध्ये यांचे झोपडे बांधून [खटले ]राहतात हे खटले राहत असताना यांचे हजारो मेंढ्या मेंढी चढाईसाठी सातपुडा पर्वत मध्ये येत असतात या वरती जर कोणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तक्रार केली तर वनविभागाचे अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी हे मात्र शून्य कारवाई करतात यामध्ये अशी काही अधिकारी आहेत की जे 100 रुपये प्रमाणे दहा मेंढ्या जप्त करून वनविभागाच्या कार्यालयामध्ये आणतात आणि त्यांना 100 रुपये प्रमाणे दंड आकारण्यात येतो परंतु सातपुडा पर्वत मोठा असून यामध्ये मेंढी पालन फक्त दहाच मेंढी चराई असू शकतात का? हा मोठा प्रश्न आहे कारण हजारो मेंढ्या सातपुडा पर्वत मध्ये चरत आहे तरीही याच्याकडे वनविभागाचे लक्ष मात्र शून्य आहे वरिष्ठाकडे यांची तक्रार केली तर वरिष्ठ व काही कर्मचारी संबंधित व्यक्तीला जो तक्रार करील त्याचे नाव सांगतात व वनविभागाच्या लाखो रुपये खर्च करून जे वनस्पती जिवंत करण्यासाठी प्लांटेशन तयार करण्यात येते या प्लांटेशनचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते यामध्ये अनेक प्रकारचे वनस्पती झाडे लावण्यात येते तरीही त्याच्याकडे कोणतीही वनविभागाचे अधिकारी वरिष्ठ हे लक्ष देत नाही वारंवार माहिती देऊनही त्याच्याकडे कोणती लक्ष दिले जात नाही आणि वरिष्ठ तसेच कर्मचारी यांना फोन केले तर ब्लॅक लिस्टमध्ये सामान्य व्यक्तीचे नंबर टाकतात आणि जंगलामध्ये सामान्य व्यक्ती फिरायला गेला असला तर त्यांना धमकी दिल्या जातो आम्ही तुमच्यावरती गुन्हा दाखल करू शकतो असे कुठपर्यंत चालणार आहे हे सामान्य व्यक्तीचा प्रश्न निर्माण झाले आहे भाग दोन पाहायला विसरू नका लवकरच आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तसेच पेपरच्या माध्यमातून लवकर प्रकाशित करू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *