मलकापूरात उद्या पत्रकारांसाठी मूल्यनिष्ठ पत्रकारिता स्नेहमिलन समारोह

मलकापूरात उद्या पत्रकारांसाठी मूल्यनिष्ठ पत्रकारिता स्नेहमिलन समारोह

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे

मलकापूर प्रसार :माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांकरीता मूल्यनिष्ठ पत्रकारीता स्नेहमिलन समारोहाचे आयोजन ६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते १२ वा. दरम्यान स्थानिक ब्रह्माकुमारीज मलकापूर या केंद्रामध्ये मीडिया प्रभाग ब्रह्माकुमारीज माऊंटआबु व ब्रह्माकुमारीज मलकापूर तथा स्थानिक पत्रकार संघांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.या आयोजित करण्यात आलेल्या मीडिया मूल्यनिष्ठ पत्रकारीता विशेष स्नेहमिलन समारोहच्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख वक्ता म्हणून नॅशनल कोऑर्डीनेटर मीडिया विंग माऊंटआबु राजस्थानचे शांतनू भाईजी हे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक केंद्राच्या ब्रह्माकुमारीज संचालिका गिता दिदी व विशेष उपस्थिती म्हणून जेष्ठ पत्रकार रमेशभाऊ उमाळकर हे राहणार आहेत. या आयोजित करण्यात आलेल्या मूल्यनिष्ठ पत्रकारीता विशेष स्नेहमिलन समारोहामध्ये मलकापूर परिसरातील सर्व प्रसार माध्यमातील काम करणाऱ्या पत्रकारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. (ता. प्र.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *