
नागपूरात दत्ताभाऊ सिरसाट यांचे हस्ते वृक्ष रोपांचे वितरण व सत्कार सोहळा संपन्न
बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शाह
भारताची उपराजधानी नागपूर रघुजी नगरातील उद्याना मध्ये पतंजली योग प्राणायम निशुल्क योग शिबीरामध्ये दि ४ ऑगष्ट सोमवारी भल्या पहाटे सकाळी साडेपाच ते सात वाजेच्या दरम्यान अखील भारतीय अंधश्रध्दा निर्मृलन समिती चे दक्षीण बुलडाणा जिल्हा संघटक दत्ताभाऊ सिरसाट* यांचा पतंजली योग प्रशिक्षक *नामदेव फटींग* यांचे हस्ते शाल आणि गुलाबी फेट्याचा मुकूट चढवून भावपूर्ण सत्कार करण्यात आला. या वेळी योग प्रशिक्षक *गुलाबराव उमाठे, पद्माकर आगरकर, मोरेश्वर मेघरे, अभा अनिस चे महासचि व हरीष देशमुख*,, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या प्रंसगी हरीव्दार पंतजली संस्थेचे रामदेव बाबा यांचे सहकारी पट्टशिष्य बाळकृष्ण यांचे जन्म दिनाचे औचित्य साधून जडी – बुटी चे औषधी युक्त गुण धर्म विषद करून दत्ताभाऊ याचे हस्ते फळ झाडे, फुले आणि वृक्षाची रोपटे वाटप करण्यात आली. प्रारंभी विविध योगासनाचा वर्ग संपल्यानंतर अखील भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती चे महासचिव *हरीष देशमुख* यांनी प्रास्थाविक पर प्रबोधन करून अ.भा.अनिस संघटनेत गत चाळस वर्षी पासून सक्रीय राहून निस्वार्थ पणे समाजाचा वैज्ञानिक दृष्टीकोन विकसीत करणार्या दत्ताभाऊ सिरसाट बुलडाणा यांच्या कार्याचा सविस्तर जिवण पट उलगडवून परीचय करून दिला. फळाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
