जनसुरक्षा कायदा रद्द करा काँग्रेसची मागणी

जनसुरक्षा कायदा रद्द करा काँग्रेसची मागणी उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सुरगे

जळगाव जामोद महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने नव्याने मंजुर केल्येला जनसुरक्षा कायदा हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सर्व सामान्य जनतेचे हक्क हिरावुन जन माणसानंवर विविध प्रकारचे अनाधिकृत निर्बंध लादनारा असल्याने हा जनसुरक्षा कायदा रद्द करणे बाबत. निवेदन दिले . महाराष्ट्र राज्य सरकार नव्याने लागु केलेला जनसुरक्षा कायदा हा जन सुरक्षेच्या नावाखाली सर्व सामान्य जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अनाधिकृत निर्बंध घालणारा हा कायदा अत्यंत चुकीचा आहे जर एखाद्या सरकारमधील मंत्री आमदार किंवा शासकीय अधिकारी यांच्या चुकीच्या प्रकारा बाबत व कोणत्याही भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवत असेल किंवा तक्रार करत असेल तर हे कृत्य राष्ट्रहिता विरोधी कृत्य ठरवुन या वर अनाधिकृत रित्या कारवाई करण्याचा अधीकार सरकार या जन सुरक्षा कायद्याच्या माध्यमातून स्वतःकडे राखुन ठेवत आहे.ऐकप्रकारे सरकार या कायद्या मुळे जन सामन्यांची व लोकशाहीच्या माध्यमांची मुस्कट दाबी करीत आहे.सत्ताधाऱ्यांचे चुकीच्या धोरणाचे सत्य जगा समोर आणण्या पासुन सर्व सामान्य जनतेला रोखण्याचे ह्या सरकारचे मनमानी धोरण आहे हे धोरण आम्हा सह समस्त सर्व सामान्य जनतेला मान्य नसुन.या कायद्याला राज्यातील विविध संघटनांनी तसेच विरोधी पक्षातील विविध राजकीय पक्षांनी तसेच भारतीय राष्ट्रिय काँग्रेस कमिटीच्या महाराष्ट्र राज्यातील पदाधिकाऱ्यांनी सुध्दा विरोध दर्शविला आहे.सरकारने हा कायदा तत्काळ रद्द करावा व सर्वसामान्य जनतेचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूळ हक्क त्यांना प्रदान करावा या मागणीसाठी जळगाव जामोद तालुका काँग्रेस कमिटी चे समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने अतिशय शांततेच्या मार्गाने निवेदन सादर करीत आहोत.आपण आमच्या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ हा जनसुरक्षा कायदा रद्द करावा.जर आपण हा जनसुरक्षा कायदा रद्द न केल्यास आम्ही यापुढे विविध प्रकारचे उग्रस्वरूपाचे आंदोलने करू यातून कोणताही अनुचित प्रकार घडल्यास याला महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकार व समस्त शासकीय अधिकारी पदाधिकारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी अशा स्वरूपाचे निवेदन मा. उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे महामयम राज्यपाल यांना तसेच माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच दुसरे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी पक्षनेते स्वातीताई वाकेकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव राम विजय भाऊ बुरुंगले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश भाऊ पाटील माजी तालुका अध्यक्ष अविनाश भाऊ उमरकर काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष एडवोकेट भालेराव शहराध्यक्ष अर्जुन भाऊ घोलप अजहर देशमुख एडवोकेट अमर पाचपोर एडवोकेट संदीप मानकर इंगळे डॉक्टर शाकीर खान अयाज भाई अब्दुल जाहीर शेख जुनेद प्रवीण भोपळे दिनेश काटकर अफरोझ भाई सुनील कळस्कर तौफिक भाई राजीव घुटे पांडुरंग भोपळे सुधाकर वानखडे आणिल ईंगळे ज्ञानेश वानखडे मारुतीभाऊ सुरळकर प्रमोद तितरे अशोक साबे विजय भाऊ गुरव नितीन जाधव शंकरभाऊ मस्केआदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *