
विद्यार्थ्यांच्या रोषानंतर महापुरुषांचे फोटो लावले पुन्हा भिंतीवर
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे
येथील सरस्वती सिनियर विद्यालयात अनुचित प्रकार होत असल्याने विद्यार्थ्यांनी शिक्षकांना जाब विचारला. त्यावर उडवाउडवीचे उत्तर दिल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्न उपस्थित झाला. मात्र, ठाणेदार गणेश गिरी, प्रा. शुभम सावळे केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष व पत्रकार करण झनके यांच्या हस्तक्षेपामुळे विद्यार्थ्यांचा रोष शांत होऊन महापुरुषांचे फोटो सन्मानपूर्वक भिंतीवर लावण्यात आले.शहरातील सरस्वती विद्यालयात शाळेचा दाखला घेण्यासाठी विद्यार्थी गेले असता महापुरुषांचे फोटो भिंतीवर दिसून आले नाहीत. याबाबत संबंधित शिक्षकाला जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे संबंधितांकडून देण्यात आली व फोटोदुसरीकडे पडलेले दिसून आले. कार्यालयात महापुरुषांचे फोटो न लावल्याने व विटंबनाहोत असल्याची माहिती विद्याथ्यर्थ्यांनी पत्रकार करण झनके, प्रा. शुभम सावळे यांना दिली. ते तिथे तत्काळ पोहचले. झनके व सावळे यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली मात्र, कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यामुळे ते मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गेले. त्यानंतर ठाणेदार गणेश गिरी यांनी घटनास्थळी जाऊन झालेल्या घटनेची चौकशी केली. हा प्रकार अनुचित असल्याने ठाणेदार गिरी यांनीकर्मचाऱ्यांना धारेवर धरले. या रोषाला तुम्ही जबाबदार असल्याचे सांगुन तात्काळ कार्यालयात महापुरुषांचे फोटो लावून त्यांना पुष्पहार अर्पण करण्याचे सांगितले. त्यावरून विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे फोटो कार्यालयात सन्मानपूर्वक लाऊन फोटोला हार घातले. यावेळी आदेश प्रभाकर इंगळे, हर्षल गजानन मेसरे, गौरव इंगळे, सनी इंगळे आदी विद्यार्थी उपस्थित होते.
