गटशिक्षणाधिकारी यांचा भावपूर्ण सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

गटशिक्षणाधिकारी यांचा भावपूर्ण सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

वाशिम जिल्हा प्रतिनिधी :- गौरव मेले वरोरा

दि. 13 जूलै 2025 रोज रविवार ला साई मंगल कार्यालय वरोरा येथे ज्ञानेश्वर विठ्ठलराव चहारे ,गटशिक्षणाधिकारी पं. स. वरोरा यांचा 30 जून ला सेवानिवृत्त झाल्यामुळे गटविकास अधिकारी , गजानन मुंडकर पं. स. वरोरा यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपप्राचार्य आनंदनिकेतन महाविद्यालय वरोरा , नामदेव राऊत माजी शिक्षण विस्तार अधिकारी, सौ सिमा अशोक राऊत माजी शिक्षण विस्तार अधिकारी, कु. श्वेता लांडे शिक्षण विस्तार अधिकारी, कु. शुभांगी पिचदुरकर शिक्षण विस्तार अधिकारी, संदीप चौधरी शिक्षण विस्तार अधिकारी , सर्व केंद्रप्रमुख पं. स. वरोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पं. स. वरोरा येथे कार्यरत तमाम शिक्षक बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर चहारे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न झाला . अध्यक्षीय स्थानावरून बोलतांना गजानन मुंडकर यांनी चहारे साहेबांच्या सेवाकालावधितील कुशल प्रशासन कौशल्याचे कौतुक केले . एका अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत सेवेची सुरवात सहाय्यक शिक्षक या पदावरून केल्यानंतर गटशिक्षणाधिकारी या पदापर्यंत चा त्यांचा हा प्रवास सगळ्यांना प्रेरणा देणारा असल्याचे ते बोलले . कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या राधा सवाने यांनी सेवानिवृत्ती नंतर जीवन कस जगावं यासाठी खुप सुंदर मार्गदर्शन केले . यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी साहेबांसोबतचे आपले प्रेम आपापल्या संबोधनातून व्यक्त केले . अनेक शिक्षक बंधू भगिनींनी आपल्या शुभेच्छा आपल्या भावपूर्ण संबोधनातून दिल्या . यावेळी गजानन मुंडकर आणि राधा सवाने यांच्या हस्ते चहारे साहेबांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमात स्कॉलरशीप परिक्षेसाठी उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल धनराज रेवतकर सरांचा मुंडकर साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . सूत्रसंचालन गोपाळ गुडधे यांनी तर आभार संजय जांभुळे यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *