प्रेमाच्या ऋणात मी आयुष्यभर बांधील राहील वाढदिवस शुभेच्छा प्रसंगी सुहास चवरे

प्रेमाच्या ऋणात मी आयुष्यभर बांधील राहील वाढदिवस शुभेच्छा प्रसंगी सुहास चवरे यांची स्नेहीजनांना भावनिक साद अभिष्टचिंतनास उसळला जनसागर

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे

आयुष्यात प्रत्येकाला जी होईल ती मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न, केवळ सल्लाच नव्हे तर साथही द्यायची. माणुसकीत कुठे कमी पडायचे नाही, असे साधे सरळ अगदी प्रामाणिकपणे जीवन जगणारे माजी नगरसेवक सुहास चवरे यांना वाढदिवसानिमित्त राजकीय सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पत्रकारिता क्षेत्रासह अनेक सर्वसामान्य स्नेही जणांनी शुभेच्छा प्रदान केल्या. तुमच्या सर्वांच्या प्रेमाच्या ऋणात मी आयुष्यभर बांधील राहील, अशी कृतज्ञता चवरे यांनी व्यक्त केली.सुहास चवरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शेकडीचाहत्यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाचे अभिष्टचिंतन केले. या प्रसंगाला आपसूकच सोहळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. हा सोहळा केवळ एका राजकीय कार्यकर्त्यांचा गौरव नव्हता, तर एका सत्यनिष्ठ, संवेदनशील आणिलोकाभिमुख व्यक्तिमत्त्याच्या जीवनमूल्यांचा सन्मान होता. सुहास चवरे हे माणुसकीचे प्रतीक म्हणून ओळखले जातात. गरजवंतांच्या मदतीसाठी सदैव तत्पर, तरुणांमध्ये प्रेरणास्थान आणि शहराच्या विकासासाठी झपाटलेले नेतृत्व अशी त्यांची सर्वसामान्य लोकांमध्ये प्रतिमा आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देणाऱ्या स्नेहजनांची मोठी गर्दी होती. फुलांच्या तोऱ्यांपासून ते मिठायांनी भरलेल्या थाळ्यांपर्यंत आणि त्याहूनही महत्त्वाचे जनतेच्यानिस्सीम प्रेमाने परिपूर्ण हा दिवस. त्यांच्या लोकप्रियतेचा पुरावा ठरला. युवक, महिला, व्यापारी, वयोवृद्ध नागरिक अर्थात थोडा मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत अगदी सायऱ्यांनी मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, त्यांचे पुढचे जीवन आरोग्यदायी व यशस्वी होवो, अशी प्रार्थना केली. प्रत्येक संकटात तुमच्यासोबत उभा राहील माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर तुम्ही मला आधार दिलात… प्रत्येक संकटात मी तुमच्यामुळे उभा राहिलो, माझ्या हातात कोणतेही मोठे पय नाही, पण तुमच्या आशीर्वादाची शक्ती आहे, म्हणूनच मी तुमचा हक्काचा माणूस आहे आणि कायम राहील, हे प्रेम म्हणजे एक जबाबदारी आहे. मी केवळ नगरसेवक महणून नाही, तर तुमचा एक भाऊ, मित्र, मुलगा म्हणून प्रत्येक वेळी तुमच्यासोबत उभा राहील. तुमच्या प्रत्येक हाकेला हाक देणे हेच माझे खरे काम आहे, असे सुहास चवरे यावेळी महणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *