
मातीला पाणी आणि बियाला बीजप्रक्रिया
जळगाव जामोद प्रतिनिधी
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्न असलेल्या स्वातंत्रवीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय, जळगाव (जामोद) येथील 7 व्या सत्राच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रम (RAWE ) अंतर्गत मडाखेड ( खुर्द ) परिसरात बिज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक केले.या उपक्रमात विद्यार्थियांनी विविध पिकांच्या बियाण्यांवर बुरशीनाशके , कीड नाशके तसेच जैविक रसायनांचा वापर करून बिज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक शास्त्रीय पद्धतीने कसे करायचे याचा उत्तम धडा शेतकऱ्यांना समजून सांगितला , तसेच बीज प्रक्रियांमुळे बियाण्यांची उगबतक्षमता, रोपाचे आरोग्य, झाडाची जोमाने वाढ व पिक निरोगीराहते या बद्दल शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करुन बीज प्रक्रियेचे महत्व शेतकन्यांना पटवून दिले.
