शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन वृक्षारोपण करून मोठ्या उत्साहाने साजरा

शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन वृक्षारोपण करून मोठ्या उत्साहाने साजरा

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरगे


जळगाव जामोद शहर शिवसेनेचे वतीने हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ ला शिवतीर्थ,मुंबई या ठिकाणी शिवसेनेची स्थापना केली आज शिवसेनेचा वटवृक्ष झाला आणि आजचा ५९ वा वर्धापन दिन जळगांव जामोद तालुक्यातील विविध ठिकाणी शिवसैनिकांचे माध्यमातून ५०० वेगवेगळ्या झाडांचे वृक्षारोपण करून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. स्थानिक ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख देविदास घोपे,तालुका प्रमुख संजय धुळे, शिवसेना शहरप्रमुख संजय भुजबळ,तालुका प्रसिद्धी प्रमुख बाळूभाऊ पाटील, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख सौ.माधुरीताई राणे, महिला आघाडी तालुकाप्रमुख सौ.सविता ढगे पाटील,किसानसेना तालुकाप्रमुख गजाननबाप्पु देशमुख, उपशहर प्रमुख पंडित माटे, एकलव्य पाटील, राजेंद्रसिंह परिहार,समाधान पाटील, जयप्रकाश बाप्पू देशमुख निभोरा,विभाग प्रमुख अंबादास चौधरी, शाखाप्रमुख विलास दातीर, अंबादास धुर्डे, रामदास निमकर्डे, दिलीप हागे यांचे अनेकांची यावेळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *