
केंद्रीय आयुष स्वतंत्र प्रभारी तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारत सरकार प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत मेहकर येथे जनता दरबार संपन्न
अमीन शेख सहसंपादक
मेहकर, सोमवार दि.१६ जून २०२५ रोजी शिवसेना जनसंपर्क कार्यालय मेहकर जि.बुलढाणा येथे ना, प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघासह विविध भागातून आलेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी उपस्थित नागरिकांनी त्यांना भेडसावणारे विविध प्रकारचे प्रश्न मांडले, त्यांचे प्रश्न जाणून घेतले. तसेच या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.ना, प्रतापराव जाधव यांच्या मतदारसंघातील नागरिकांचा हाच विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आणि त्यांना दैनंदिन आयुष्यात भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी तसेच शासन दरबारी रखडलेले प्रश्न जलदगतीने मार्गी लावण्यासाठी नियमित स्वरूपात ” केंद्रीय मंत्री आपल्या भेटीला – जनता दरबार उपक्रमाचे ” आयोजन करण्यात येत असते.याप्रसंगी त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असून, सर्वोतोपरी प्रयत्न करत राहणार असल्याचा ना ,प्रतापराव जाधव यांचा विश्वास नागरिकांशी संवाद साधत असतानी व्यक्त केला.
