
तिरंगा यात्रा कृती समितीतर्फे काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे
पहलगाम येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारत सरकारतर्फे राबविण्यात आलेल्या धाडसी व यशस्वी अशा ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सशस्त्र दलातील जवानांनी दाखवलेल्या शौर्यास सलाम करण्यासाठी शहरात आज २० मे रोजी तिरंगा यात्रा कृती समितीतर्फे तिरंगा यात्रा काढण्यात आली.सदर तिरंगा यात्रेस येथील शहीद संजयसिंह राजपूत यांच्या स्मारकापासून सकाळी ९ वाजता शहिदांना अभिवादन करीत प्रारंभकरण्यात आला. यावेळी तिरंगा यात्रेत सहभागी झालेल्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम असे नारे देत सदर तिरंगा रॅलीशहरातील बुलढाणा रोड मार्गे हनुमान चौक येथून तहसील चौक येथील हुतात्मा स्मारक येथे पोहचली. याठिकाणी राष्ट्रगीत म्हणून तिरंगा रॅलीचा समारोप करण्यात आले.या तिरंगा रॅलीमध्ये तयार करण्यात आलेला १५० फुटाचा तिरंगा ध्वज रॅलीचे आकर्षण ठरले. रॅलीमध्ये सहभागी असणाऱ्या सदस्यांनी तिरंगाकिराणा ध्वज आपल्या हातात घेऊन सामर्थ्यशाली आपल्या सैन्य दलाचे कौतुक करीत भव्य स्वरूपाची तिरंगा रॅली उत्साहा संपन्न केली.शिस्तबध्द असणाऱ्या य तिरंगा रॅलीमध्ये शहरातील विविध संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते तथा नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
