ग्राम तरोडा खुर्द येथील ७२ वर्षीय शेतकरी विष प्राशन करून आत्महत्या

जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम तरोडा खुर्द येथील ७२ वर्षीय शेतकरी कर्जामुळे विष प्राशन करून आत्महत्या

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे

जळगांव जामोद:-जळगांव जामोद तालुक्यातील ग्राम तरोडा खुर्द येथील ७२ वर्षीय शेतकरी श्री चिंधाजी श्रीपत पवार यांनी दिनांक २६ एप्रील रोजी संध्याकाळी ६ वाजता स्वतः च्या शेतात विष प्राशन केल्याचे त्यांचा पुतण्या विलास पवार यास आढळुन आले असता त्यांनी लगेचच जळगांव जामोद येथे सरकारी दवाखान्यात घेऊन गेले त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून खामगांव येथे रेफर केले परंतु त्यांची तब्येत खालावत असल्याने सामान्य रुग्णालय खामगांव येथून सुद्धा अकोला येथे पाठविण्यात आले त्याठिकाणी लगेचच डॉक्टारांनी उपचार सुरू करुन शर्तीचे प्रयत्न करुन सुद्धा रात्री २ वाजुन ३० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मावळली चिंधाजी पवार यांचे नावावर १ हेक्टर २१ आर शेती असुन सदन कास्तकार म्हणून त्यांची ओळख होती, परंतु २२ जुलै २०२३ रोजी झालेल्या महापुराच्या पुराने संपुर्ण शेती पिकांसह खरडुन गेली आणि सरकारने जाहीर केलेल्या सानुग्रह अनुदान त्यांना नियमा पेक्षाहि कमी मिळाले,सततच्या नापिकीमुळे व सेंट्रल बँक च्या थकित कर्जामुळे, बँक कर्मचारी यांच्या तगाद्यमुळे अखेर विष प्राशन करून आत्महत्या केली त्यांच्या पश्चात दोन मुले,सुना व पत्नी असा बराच मोठा आप्त परिवार आहे त्यांच्या या दुखःद निधनाने तरोडा गावात व परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *