जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पळसखेड रायपुर यांच्या वतीने पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले

राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पळसखेड रायपुर यांच्या वतीने पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले

जावेद शहा बुलढाणा तालुका प्रतिनिधी

रायपुर,बुलढाणा ,दि. 19 एप्रिल राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पळसखेड रायपुर येथे आज दिनांक 19 /04/2025 वार शनिवार ला पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्था अध्यक्ष संदीप दादा शेळके होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून तुषार डोडीया होते तसेच मंचकावर पालक प्रतिनिधी म्हणून श्री. रामेश्वर गवते पोलीस पाटील पिंपळगाव सराई तसेच सुधाकर काका सिरसाट होते. सर्वप्रथम दिपप्रज्वलन व मा जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून पालक सभेस सुरुवात करण्यात आली. यावेळी शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट यांनी गेल्या दहा वर्षातील शाळेचा लेखाजोखा पालकांसमोर मांडला. तसेच या सत्रापासून NEP 2020 अंतर्गत सि बी एस ई अभ्यासक्रम पुढील सत्रापासून सुरू करीत असल्याचे सांगितले. तुषार डोडीया सर यांनी आपल्या भाषणात सी. बी. एस. ई. अभ्यासक्रम नेमका काय. तो राबवण्याची ध्येय धोरणं काय. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कसा सकारात्मक बदल घडून येईल. हे सांगताना पालकांची सुद्धा काय कर्तव्य आहेत. हे सांगीतले. आपल्या घरातील वातावरण कसं आहे यानुसार मुलं बघत- बघत शिकत असतात. त्यामुळे पालकांची खूप मोठी जबाबदारी आज वाढलेली आहे. आपण मुलांसमोर मोबाईल घेऊन बसलो तर मुलं मोबाईल बघतील आपण मुलांसमोर पुस्तकं घेऊन बसलो तर निश्चितच मुलं पुस्तक घेऊन बसतील. त्यामुळे पालकांना कळकळीची विनंती की, आजचा हा स्पर्धेचा काळ आहे. त्यामुळे मुलांना वेळ द्या. आज जर आपण मुलांना वेळ देत नसाल तर आपल्या उतारवयात त्यांच्याकडून वेळेची अपेक्षा करू नका. मुलं हे अनुकरणीय असतात. शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांच्या तिघांच्या सकारात्मक क्रियातून मुलांचा विकास होत असतो. तर आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थाध्यक्ष संदीप दादा शेळके म्हणाले की, गेल्या काही वर्षापासून सातत्याने आपण वेगळ्या प्रकारे शिक्षण जिजाऊ ज्ञान मंदिराच्या माध्यमातून मुलांना देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यानुसार यावर्षी स्पोर्ट मध्ये 27 विद्यार्थी राज्य स्तरावर पोहोचले तर बारा विद्यार्थ्यांना शासनाची स्कॉलरशिप मिळते. त्याचबरोबर आपण सीबीएससी पॅटर्न पुढील शैक्षणिक सत्रापासून पासून सुरु करत आहोत. तसेच डिजिटल सॉफ्टवेअर व पॅनल यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्ता सुधारण्यासाठी निश्चित मदत होत आहे. याचबरोबर जिल्हा विज्ञान प्रदर्शनी मध्ये सुद्धा आपल्या शाळेला दोन्ही गटात प्रथम व द्वितीय क्रमांक मिळणे हि आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. आपला विद्यार्थी हा सर्वांग दृष्टीने सर्वगुण संपन्न माणूस कसा बनेल या दृष्टीने आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत. जगाच्या पातळीवर जिजाऊ ज्ञान मंदिर चा विद्यार्थी टिकला पाहिजे यासाठी चांगलं इंग्रजी शिक्षण देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आज आपण तुषार डोडीया सरांच्या माध्यमातून सातत्याने शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे काम करत आहोत. शिक्षक व विद्यार्थ्यांवर मेहनत घेत आहोत. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी पुढे गेले पाहिजे. यासाठी नीट जेईई च्या प्रशिक्षणाची सोय आपण मोफत जिजाऊ ज्ञान मंदिर मध्ये उपलब्ध करून देत आहोत. त्याचबरोबर अतिरिक्त गुणवत्ता वाढीसाठी अतिरिक्त शिकवणी आपण विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत. भविष्यात एका छताखाली सर्व शिक्षण कसे मिळेल यासाठी प्रयत्नरत आहोत असेही ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमासाठी बहुसंख्य पालकांची उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन रूपाली सुसर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *