आदिवासी कुटुंबावर जमिनीच्या वादातून जीवघेणा हल्ला

आदिवासी कुटुंबावर जमिनीच्या वादातून जीवघेणा हल्ला.. हल्ल्यामध्ये निमखेडी येथील मंगलसिंगची मृत्यूशी झुंज…

जळगाव जामोद प्रतिनिधी…

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत हद्दीतील कहूपट्टाशेत शिवारातील 21 एकर जमिनीचा वाद चिघळल्याने यामध्ये आदिवासी कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना दिनांक २३ मार्च रोजी घडली…हिंदू मुस्लिम दोन धर्मातील बक्षीस पत्रावरून या जमिनीचा वाद विकोपाला गेला असून संबंधित वादग्रस्त जमिन मागील २० वर्षापासून कसणाऱ्या मंगलसिंगच्या जीवावर बेतला आहे ..जळगाव जामोद नगरपालिका मध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत असणाऱ्या द्वारकाबाई ढगे यांची कहुपट्टा शिवारात २१ एकर जमीन होती… त्यांना मुलं बाळ नव्हती परंतु त्यांना एक भाऊ आणि त्याचा मुलगा म्हणजेच भाचा म्हणून वारस आहेत … अशा परिस्थितीत ही जमीन त्यांनी जळगांव जामोद शहरातील मुस्लिम समाजाच्या गॅरेज मालकाला जिवंतपणी रजिस्टर व्यवहाराद्वारे मृत्युपत्र तयार करून दिली आहे …दरम्यान ही जमीन मयत द्वारकाबाई ढगे ह्यांनी सातपुडा पर्वतातील आदिवासी बांधवाकडे कित्येक वर्षापासून ठोका पद्धतीने मशागति करीता दिलेली होती … कसेल त्याची जमीन या उक्तीप्रमाणे आज आदिवासी बांधव सुद्धा या जमिनीवर आपला हक्क सांगत आहेत…मृत्युपत्र मालक, वारसा हक्क आणि मशागत करणारे आदिवासी बांधव यांच्यात मागील एक महिन्यापासून सातत्याने वाद होत असून याबाबत आदिवासी कुटुंबाने जळगाव पोलीस स्टेशनला अनेकदा तक्रारी सुद्धा दाखल केलेल्या आहेत … परंतु त्यांच्या तक्रारीचे स्थानिक ठाणेदाराने दखल न घेता फक्त चौकशीवर ठेवल्यामुळेच आजची हे गंभीर घटना घडली असा आरोप निमखेडी परिसरातील आदिवासी बांधव करीत आहे …. २३ मार्च रोजी झालेल्या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाल्याने त्यामध्ये मंगलसिंग हा आदिवासी शेतकरी गंभीर जखमी झाला आहे…. गंभीर जखमी मंगलसिंग ह्याला खामगावून अधिक उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आले असून त्याची प्रकृती अतिशय गंभीर असल्याची माहिती खामगाव येथील शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *