
मलकापूर-नांदुराच्या वीज समस्येवर तातडीचा निर्णय – आमदार संचेतींच्या प्रयत्नांना यश ट्रान्सफॉर्मर्स बसविण्याचे आदेश अवघ्या ३ दिवसांत होणार कारवाही
अमिन शेख सहसंम्पादक
मलकापूर , मलकापूर-नांदुरा मतदारसंघातील नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी! मागील काही काळापासून वाढत्या वीज भारामुळे लो-व्होल्टेज व वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त होते. या समस्येवर तातडीचा तोडगा काढण्यासाठी आमदार चैनसुख संचेती यांनी विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला, आणि अखेर विशेष योजनेंतर्गत मलकापूर विभागासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर झाले आहेत.ऊर्जा विभागाच्या धोरणानुसार, ज्या भागात 63 KVA चे ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड झाले आहेत आणि ओव्हरलोड झाल्यामुळे ट्रान्सफॉर्मर वारंवार जळत आहेत अश्या सर्व ठिकाणी 100 KVA चे नवीन ट्रान्सफॉर्मर्स अवघ्या 3 दिवसात बसविण्यात येणार असून आमदार संचेती यांच्या प्रयन्तांमुळे शेतकऱ्यांच्या समस्या आता दूर होणार आहेत सतत जनतेसाठी झटणाऱ्या आमदार चैनसुख संचेती यांच्या धडपडीमुळे हा मोठा निर्णय झाला असून, त्यांच्या पाठपुराव्यामुळे मलकापूर-नांदुऱ्याला विशेष योजनेअंतर्गत नवीन ट्रान्सफॉर्मर्स मिळाले आहे अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
