
बुलडाणा जिल्ह्यातील व शहरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नवीन नियुक्त्या जाहीर.
अमिन शेख सहसंम्पादक
बुलडाणा ,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या बुलडाणा जिल्ह्यातील व शहरातील नवीन पदावर आज दिनांक १०/३/२०२५ संपर्क प्रमुख प्रा श्री नरेंद्र खेडेकर यांनी नियुक्त्या जाहीर केल्या. यावेळी जनशिक्षण सभागृह बुलडाणा येथे पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात *जिल्हा प्रमुख श्री जालिंदर बुधवत, जिल्हा समन्वयक श्री संदिप दादा शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. नियुक्त्यांमध्ये श्री मोहम्मद सोफियान यांची अल्प संख्याक आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष पदी, श्री अनिकेत गवळी यांची युवासेनेच्या बुलडाणा शहराच्या शहर प्रमुख पदी, श्री राहुल जाधव व श्री आकाश गायकवाड यांची उप शहर प्रमुख बुलडाणा या पदी नियुक्ती करण्यात आली. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मान्यवरांनी नियुक्ती पत्र व भगवा रुमाल टाकून अभिनंदन केले व त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुका प्रमुख लखन गाडेकर, मोताळा तालुका प्रमुख विजय इंगळे, किसान सेना तालुका प्रमुख गजानन उबरहंडे, युवासेना उप जिल्हा प्रमुख डॉ अरुण पोफळे, युवासेना तालुका प्रमुख संजय शिंदे, अल्प संख्याक तालुका प्रमुख बबन खरे, उप तालुका प्रमुख एकनाथ कोरडे, किशोर कानडजे, शेख रज्जाक कुरेशी, निर्मल इंगळे, शेख मुजम्मील, शेख नासिर, शनिराज सौदे, सागर हिवाळे, तन्वीर खान अ संख्याक उप श प्र, समीर खालिद बागवान तालुका अध्यक्ष, अनिल राणा, आनंद वाघ, यासीन तन्हा यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
