बुलढाणा येथे भाजपा सदस्यता महाअभियानाची “शिवालयात” बैठक सम्पंन्न

बुलढाणा येथे भाजपा सदस्यता महाअभियानाची “शिवालयात” बैठक सम्पंन्न -भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ गणेश मांटे व मा.आमदार विजयराज शिंदे यांचे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन -सामाजिक कार्यकर्ते मोहन निमरोठ यांचा सहकाऱ्यां समवेत भाजपात प्रवेश

अमिन शेख सहसंम्पादक

बुलढाणा- भारतीय जनता पक्षाचे सदस्यता महाअभियान पूर्ण भारतभर सुरूच आहे. आज दि. ५ जानेवारी २०२४ रोजी बुलढाणा येथे भाजपा नेते मा.आमदार विजयराज शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालय शिवालय येथे भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ गणेश मांटे यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले .यावेळी उपस्थित पदाधिकारी यांनी मोबाईलद्वारे नोंदणी करून भाजपा सदस्यता अभियानाची स्वतः पासून सुरवात केली.भारतीय जनता पक्ष मिळालेल्या यशाने होरपळून जाणारा पक्ष नसून निवडणुकीच्या दुसऱ्या दिवसा पासून संघटना व कार्यकर्ते तयार करण्याचे काम बूथ स्तरापासून करत असते, भारतीय जनता पक्षाची सदस्यता नोंदणी वाढवून पक्षाची ताकद अधिक मजबूत करण्यासाठी हे अभियान पूर्ण क्षमतेणे राबवा असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ गणेश मांटे यांनी भाजपा पदाधिकारी यांना बैठकी दरम्यान केले आहे.मा.आमदार विजयराज शिंदे यांनी देखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून सदस्यता नोंदणी अभियानाचे महत्व समजावून भारतीय जनता पक्षाची ताकद ही जास्तीत जास्त सदस्यता नोंदणी करून दाखवून द्यावी त्यासाठी शेवटच्या घटका पर्यंत पोहचण्याच्या सूचना सुद्धा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते याना दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *