
आ. चैनसुख संचेती यांच्या कल्पनेतून साकारला जनता दरबारविविध अधिकाऱ्यांची उपस्थिती ४४९ तक्रारी व निवेदने
प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर नागरिकांच्या समस्या, तक्रारी व अडवणींचा निपटारा करण्याकरीता आज ३० डिसेंबर रोजी स्थानिक भ्रातृमंडळ येथे आ. चैनसुख संचेती पांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबारचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजित जनता दरबारमये तब्बल ४४९ तक्रारी व निवेदने प्राप्त झालीत.आज भ्रातृमंडळ येथे मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार चैनसुख संचेती यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार आयोजित करण्यात आला होता, यावेळी उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे, तहसीलदार राहुल तायडे, पोलीस निरीक्षक गणेश गिरी, संदीप काळे व अमोल कोळी तसेच जिगांव प्रकल्प व सा.बा. विभाग, आरोग्य, जलसंधारण,वीज वितरण, नगर परिषद, कृषी विभाग, जि.प., पंचायत समिती यांसह सर्वच शासकीय विभागाचे कर्मचारी, पदाधिकारी व स्थानिक कार्यकत्यांची प्रामुख्याने उपस्थितीहोती. मलकापूर तालुक्यातील जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी तसेच त्या सोडवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात दिलाआले. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच जनतेचे प्रश्न तातडीने सोडवण्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.आ.चैनसुख संचेती यांनी आपल्या मनोगतातून जनता दरबार हा लोकांच्या समस्या सोडवण्याचा आणि विकासकामांना गती देणारा प्रभावी मार्ग असल्याचे प्रतिपादन केले, त्यांनी शेतरस्त्यांचे उत्कृष्ट जाळे, शेतशिवाराचे समृद्धीकरण, प्रत्येक घरात बीज, उत्तम आरोग्यसेवा, आणि दवाखान्यांच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्दिष्टांवर भर दिला.
