मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना कायम स्वरुपी सेवेत घेण्यात यावे तहसिलदार नांदुरा मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना कायम स्वरुपी सेवेत घेण्यात यावे तहसिलदार नांदुरा मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

नांदुरा:-* (प्र.) मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सर्व आस्थापनांमध्ये ०६ महिन्यांकरिता कामे करित आहेत. त्यामुळे सदर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांना सरकारी सेवेत कायम रुजू करण्यासंदर्भात सर्व प्रशिक्षणार्थी यांनी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. तसेच यामध्ये खालील मागण्या करण्यात आल्या आहेत – १) नियमानुसार काम आणि दरमहा पाच तारखेच्या आत विद्यावेतन मिळावे.२) युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील किमान वेतन कायद्यानुसार किमान २०,००० वेतन मिळावे.३) काम करुनही दप्तर दिरंगाई मुळे विद्यावेतन मिळत नसेल तर दिरांगाई करण्यावर कारवाई करण्यात यावी.४) सहा महिने यशस्वी प्रशिक्षण झाल्यानंतर आम्हाला कायमस्वरूपी रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात यावे.तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर इच्छुक उमेदवारांना ज्या ठिकाणी काम करत असतील त्या ठिकाणीच त्यांना कायमस्वरूपी करु असे प्रचारसभेत मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व मा. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा साहेब यांनी आश्वासन दिले होते. त्यानुसार सर्व प्रशिक्षणार्थींना कायम स्वरुपी करण्यात यावे.५) शासकीय किंवा निमशासकीय नोकरदारांना प्रासंगिक रजा आहेत. त्या आम्हालाही देय असावे.६) वेगवेगळ्या शासकिय विभागाच्या परिक्षा भरती प्रक्रियामध्ये प्रशिक्षणार्थींना १०% राखीव जागा ठेवाव्यात. अशा प्रकारच्या मागण्यांचे निवेदन दिनांक ३० डिसेंबर रोजी देण्यात आले आहे.यावर दत्तात्रय मुकुंद, निखिल देशमुख, शिवाजी इंगळे,अजय आसनकार,विवेकमुमार अढाव, वैभव पारस्कर,प्रितम वाघ, संतोष अढाव,रतन भोटकर,विषाल भोटकर,धिरज बढे, रतन निंबोळकार, प्रविण कांडेलकर, ज्ञानेश्वर लाहुडकार, मनोज करुटले, सचिन हेलगे, गजानन सुर्यवंशी, लोकेश पवार,विक्रम देशमुख, ऋषिकेश साबे, निंबाजी पवार, प्रफुल्ल भिडे,अंकज इंगळे, दत्ता टिकार,मोहन वाघ, योगेश ढोले, संदेश इंगळे,,स्नेहा वनारसे,सागर डामरे, गणेश गायकवाड, दिलीप दांदळे,आबिद खान,सरिता घाटे,शुभम राऊत,रोहन गिते,अजय धोंडे यासह अनेकांच्या सदर निवेदनावर सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *