
स्वयंसेवकांनी श्रममुल्यांची जोपासना करावी.दि न्यू इरा कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराचा समारोप
प्रतिनिधी.जळगाव जामोद : आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात श्रमाचे महत्त्व अत्यंत कमी होत असून, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून श्रममूल्यांची जोपासना करून राष्ट्रहिताच्या दृष्टीने कार्य करावे, असे प्रतिपादन जळगाव शिक्षण मंडळाचे सचिव अनुप पुराणिक यांनी केले.दी न्यू इरा कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय, जळगाव-जामोदच्या वतीने निमखेडी येथील विशेष श्रमसंस्कार शिबिरातअध्यक्षस्थानावरून बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना जीवनात शिस्तीचे महत्त्व विशद केले. जळगाव पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक नारायण सरकटे यांनी मार्गदर्शन केले. शिबिरात विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. स्पर्धेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी भाग गेला घेतला, त्या सर्व विद्यार्थ्यांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले. संचालन कार्यक्रमाधिकारी प्रा. अनिल डाबरे यांनी केल; तर राष्ट्रीय सेवा योजना बुलढाणा जिल्हा समन्वयक प्रा. निळकंठ राठोड यांनी आभार मानले.
