
“आदिवासी व पारधी बांधवांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी दिवाळी..”-डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर. “आदिवासी व पारधी बांधव यांच्या सोबत दिपावली साजरी.
(प्रतिनिधी) सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या आदिवासी बांधवां बद्दल कृतज्ञता व्यक्त करता यावी व पारधी समाज बांधव यांना प्रवाहात आणण्या करीता आज बांधवां सोबत आज दिपावली साजरी कऱण्यात आली. दिपोत्सव आदिवासी बांधवां सोबत आज साजरा करण्यात आला येत असल्याचे सांगत आदिवासी व पारधी बांधवांच्या वेदनांची जाणिव असल्याने समाजातील प्रत्येक घटक महत्त्वाचे असल्याची भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव तथा महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉ.सौ.स्वातीताई संदीप वाकेकर यांनी व्यक्त केली. राजकीय व सामाजिक व्यवस्थेने आदिवासी बांधवांना दुर्लक्षित करण्यात आले. आजही आदिवासी बांधवांना संघर्षमय जिवण जगावे लागते. आजही आदिवासी बांधवांना आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या जात नाहीत. परिणामी निष्पाप बळी जात आहेत. त्यांच्या संवेदना, वेदना समजुन घेत दिवाळी उत्सव साजरा करून आदिवासी बांधवांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा छोटासा प्रयत्न म्हणुन ही दिवाळी आदिवासी बांधवांसोबत करत असल्याचे डॉ.सौ.वाकेकर यांनी म्हटले. या दिपोत्सवातुन माणुसपण जपता आलं पाहिजे ही प्रामाणिक भावना व्यक्त करत. ही दिवाळी साजरी केली.यावेळी असंख्य पारधी व आदिवासी बांधव उपस्थीत होते.
