
राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वर्धापन दिनानिमित्त रुग्णालयात फळवाटपाचा कार्यक्रम संपन्न…
जळगांव (जा) दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या 30 व्या वर्धापन दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय, जळगाव (जामोद) जि. बुलढाणा येथे रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम सकाळी 9:00 वाजता संपन्न झाला. या दिवशी 45 रुग्णांना फळे व बिस्किटे वाटप करुन वर्धापनदिन साजरा करण्यात आला.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.दिपक केदार यांचेसह राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे बुलढाणा
जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव इंगळे, जिल्हा सचिव सुखदेव थोटे, जळगांव (जामोद) तालुक अध्यक्ष नागेश भटकर, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजय तांदळे, युवा आघाडी जिल्हा सचिव संदिप इंगळे, गठई कामगार विभागाचे जळगांव (जामोद )तालुका अध्यक्ष शामलाल रेठे,गुरु रविदास सत्यशोधक समाजाचे बुलढाणा जिल्हा संयोजक रविंद्र शेकोकार,विठ्ठलराव सावळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
