राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जळगाव जामोद व संग्रामपुर तालुका नियुक्तया जाहिर

प्रतिनिधी जळगाव जामोद
दिनांक 25 डिसेंबर 2023 रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तथा अनुसूचित जाती जमाती जळगाव जामोद व संग्रामपुर तालुक्याच्या नियुक्तया जाहिर करन्यात आल्या. अल्पसंख्याचे प्रदेशअध्यक्ष जावेद हबीब यांनी जामोद येथील एम.डी. साबीर यांची बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदी निवड केली त्यांचे नियुक्तपत्र ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते तथा प्रदेश सरचिटनीस प्रसेनजीत पाटिल यांच्या उपस्थितीत देण्यात आले. अनुसूचित जाती जमाती जळगाव जामोद तालुकाध्यक्ष पदी मंगल डोंगरदिवे, जळगाव शहराध्यक्ष पदी अरविंद जुमळे व संग्रामपुर तालुकाध्यक्ष पदी सौ.सरस्वती संजय बापट यांची जिल्हाध्यक्ष राजेंद्र गवई यांनी नियुक्ति केली. नवनियुक्त पदाधिकारी यांनी नियुक्ति साठी जळगाव जामोद मतदारसंघाचे नेते प्रसेनजीत पाटिल यांचे विशेष आभार मानले तथा शरदचंद्र पवार साहेब यांचे विचार लोकांपर्यंत पोहचवून संघटन मजबूत करणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *