स्वातंत्र्यविर गणपतराव इंगळे कृषी व उद्यानविद्या महाविद्यालय, जळगाव जामोद येथे एड्स जनजागृती सप्ताहाचे आयोजन

स्वातंत्र्यविर गणपतराव इंगळे कृषी व उद्यानविद्या महाविद्यालय, जळगाव जामोद येथे एड्स जनजागृती सप्ताहाचे आयोजन

प्रतिनिधी जळगाव डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित व सातपुडा शिक्षण संस्था, जळगांव जामोद द्वारा संचालित स्वातंत्र्यविर गणपतराव इंगळे कृषी व उद्यानविद्या महाविद्यालय, जळगाव जामोद येथे दिनांक १ डिसेंबर २०२३ ते ७ डिसेंबर २०२३ दरम्यान एड्स जनजागृती सप्ताह निमित्त रेड रिबन क्लब व राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक ८ डिसेंबर २३ रोजी महाविद्यालयाच्या वतीने सप्ताहाचे समारोप करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.योगेश गवई व उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विशाल तायडे तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.गजानन देशमुख, प्रमुख अतिथी म्हणून डॉ.संदीप बंबटकार व कुलकर्णी मॅडम, प्रा.अविनाश आटोळे (कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना, कृषि महाविद्यालय), डॉ.अनिकेत उमाळे (कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना, उद्यानविद्या महाविद्यालय) आणि प्रा.प्रितेश वानखडे उपस्थित होते. यावेळी प्रा.अविनाश आटोळे यांनी प्रास्ताविक करतांना एड्स जनजागृती सप्ताह बाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक डॉ.गजानन देशमुख (जिल्हा समुपदेशक, आय सी टी सी, बुलढाणा) यांनी एड्सची लागण होण्याची कारणे, लक्षणे व उपाययोजना यासंदर्भात उपस्थित विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. यानंतर प्राचार्य डॉ.विशाल तायडे यांनी युवकांनी समाजात एड्सबाबत जनजागृती करून महाविद्यालयात “एड्स सप्ताह” निमित्त आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, व्हिडिओ/रील स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, यांच्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व यानंतर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांनी उपस्थित सर्वांना एड्स नियंत्रण विषयी शपथ प्रदान केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अविनाश आटोळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ.विशाल तायडे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व महाविद्यालय व्यवस्थापन समिती पदाधिकारी, प्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचे अमूल्य सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *