देशी कट्ट्या व सात जिवंत काडतूससह आरोपी अटक, चौघे फरार

जळगाव जामोद प्रतिनिधी
बुलढाणा जिल्हातील जळगाव जामोद पोलिस स्टेशन अंतर्गत देशी कट्यांची जोरात विक्री सुरु आहे गुप्त माहिती वरून गुन्हे साखेची या खरेदी-विक्री करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ नोव्हेंबर रोजी घटनास्थळावर रंगेहाथ पकडले. व यावेळी पोलिसांनी चौघांना अटक केली तर चारजण घटनास्थळावरून पसार झाले पोलिसांनी देशी कट्यासह सात जिवंत काडतूस व इतर साहित्य सह १४ लाख ३ हजार रुपयांचा एवज केला जमा.अकोला येथील मध्यस्थाच्यामार्फत पुणे येथील दोघेतर जळगाव जामोद पोलिस स्टेशन अंतर्गंत गोडाळा डॅम येथे देशी कट्टा खरेदीसाठी आले होते. याविषयी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देशी कट्याचा खरेदी- विक्रीचा व्यवहार सुरू असतानाच छापा टाकला.यावेळी मोहम्मद अख्तर शेख मुश्ताक रा. वाशिम बायपास अकोला, फहदखान फारुखखान रा. भवानीपेठ पुणे, तौसिफ करीमखान रा. रविवारपेठ पुणे, रामसिंग भवानसिंग मुझाल्दा रा. निमखेडी ता. जळगाव जामोद यांना अटक केली.तसेच इतर चारजण घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी आरोपींकडून एक देशी कट्टा किंमत ३० हजार, ७ जिवंत काडतूस किंमत ३ हजार ५०० रुपये, कार किंमत १२ लाख व इतर साहित्य असा १४ लाख ३ हजार ५०० रुपयांचा एवज जप्त केला. या कारवाई ने ही असे धंदे करनाऱ्याच्या धाबे दणावले आहे पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *