
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचा कर्जत येथील वृक्षतोडीविरोधात आक्रोश ऊर्जा प्रकल्प स्थलांतरित करण्याची मागणी
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
कर्जत (जि. रायगड) येथील अत्यंत संवेदनशील मानल्या जाणान्या सह्याद्री भीमाशंकर पर्वत रांगेत टोरंट पॉवर कंपनीचा ऊर्जा प्रकल्प उभारला जात असून, या प्रकल्पाच्या नावाखाली हजारो दुर्मिळ वृक्षांची बेसुमार कत्तल केली जात आहे. या निसर्ग संहाराविरोधात माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन (महासंघ) शाखा तालुका मालेगाव, जि. वाशिम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तीव्र विरोध दर्शवणारे निवेदन तहसीलदार, मालेगाव यांच्यामार्फत सादर केले आहे.दि. 29/10/2026 रोजी दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, भीमाशंकरचा परिसर हा महाराष्ट्राचे नैसर्गिक वैभव असून जैवविवीधतेने नटलेला आहे. अशा पवित्र आणि पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाच्या क्षेत्रात हा विनाशकारी प्रकल्प राबवणे अत्यंत चुकीचे आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनमानसामध्ये प्रचंड असंतोध निर्माण झाला आहे.हे प्रत्येक नागरिकाचे आणि शासनाचे निसर्ग आणि पर्यावरण वाचवणे घटनात्मक कर्तव्य आहे. प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ योग्य ती कारवाई करावी आणि चालू असलेली वृक्षतोड थांबवावी.जर शासनाने लोकभावनेचा आदर केला नाही आणि हा निसर्गाचा संहार थांबवला नाही, तर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र लोकआंदोलन छेडले जाईल, ज्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.महासंघाच्या प्रमुख मागण्या१ भीमाशंकर पर्वत रांगेत टोरंट पॉवर प्रकल्पासाठी सुरू असलेली वृक्षतोड तातडीने आणि कायमस्वरूपी थांबवण्यात यावी.2 या प्रकल्पाला दिलेल्या पर्यावरण विषयक परवान्यार्हाची तात्काळ पुनर्तपासणी करण्यात यावी.3 हा प्रकल्प या निसर्गरम्य आणि संवेदनशील क्षेत्रातून हटवून अन्य कोणत्याही पर्यायी मोकळ्या किंवा पडीक जागेत स्थलांतरित करण्यात यावा.आम्ही विकासाच्या विरोधात नाही, परंतु पर्यावरण आणि समृद्ध जंगलांचा संपूर्ण विनाश करून होणारा विकास आम्हास मान्य नाही. निसर्गाची हानी करून साधलेला विकास हा मानवाच्या विनाशाला कारणीभूत ठरेल.”माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ या निवेदनावर माहिती अधिकार कार्यकर्ता माणिक खिमाजी डोंगरे, अतुल ज्ञानदेव ढगाले, मिलिंद राघोजी खरात, कवि लक्ष्मण राठोड, विशाल संतराम ताले, शंकर नामदेव डडोके, अनिल गंगाराम जाधव, शरद सोनोने आदी पदाधिकान्यांच्या सह्या आहेत.
