
नवीन पीक-कर्ज देण्यासाठी बँकांकडून ज्याचक अटी लावल्या जात असल्याने शेतकरी प्रचंड त्रस्त.अक्षय पाटील यांनी घेतली भारतीय स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाची भेट…!
जळगाव (जा.):- बँकांकडून नवीन पिक कर्ज मिळावे यासाठी शेतकरी बँकांकडे कागदपत्रांची जुळवाजुळ करून अर्ज करीत आहेत मात्र यामध्ये शेतकऱ्यांना बँकांकडून विविध अटी-शर्ती-निकष-नियम लावुन शेतकऱ्यांना पिक-कर्ज देण्यास टाळाटाळ करून नाहक त्रास देण्याचे काम होत आहे.यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर पतसंस्थेचे कर्ज आहे तसेच मायक्रो फायनान्स यांच्याकडून कर्ज घेतले व ते थकीत राहिले त्या शेतकऱ्यांना सुद्धा बँका पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत असून अशा शेतकऱ्यांची संख्या जेमतेम ४०% आहे.वास्तविक पाहता मायक्रो फायनन्स,पतसंस्था यांचा पीक कर्जाची कोणताही संबंध नसल्याने बँकांनी कोणतीही अट न लावता तातडीने शेतकऱ्यांना पीक कर्ज देणे बंधनकारक आहे मात्र बँका ऐकायला तयार नसल्याने आज दिनांक २/११/२०२६ रोजी युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी भारतीय स्टेट बँक जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांसमवेत धडक दिली असून कोणतीहे निकष न लावता तातडीने शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करा अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा बँक प्रशासनाला दिला.
