
गोभणीच्या हिमांशूची अमेरिकेत ऐतिहासिक कामगिरी
वाशीम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! भारतीय विक्रम मोडत जागतिक टॉप २० मध्ये स्थान
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव):
जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील गोभणी गावचे सुपुत्र हिमांशू कैलास साबळे यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लेक एल्सिनोर येथे ८ ते १४ आॅक्टोबर २०२६ दरम्यान आयोजित एफएआय विंगसूट वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत भारतीय साहसी क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. टाइम डिसिप्लिन या प्रकारात त्यांनी ८७.४ सेकंद हवेत राहण्याची नोंद करत यापूर्वीचा ७८ सेकंदांचा भारतीय विक्रम ९.४ सेकंदांनी सुधारला. या स्पर्धेत त्यांनी जागतिक तरावरील पहिल्या २० खेळाडूंमध्ये स्थान मिळवल्याची माहिती आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे गोभणी, रिसोड आणि संपूर्ण वाशीम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
चौकट आशिया खंडीय विक्रमासाठी २३२ सेकंदांची ऐतिहासिक नोंद स्पर्धात्मक कामगिरीबरोबरच हिमांशू साबळे यांनी बिगर-स्पर्धात्मक विंगसूट फ्लाइंगमध्येही महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. या प्रकारातील आशिया खंडाचा यापूर्वीचा विक्रम १८० सेकंदांचा होता. हिमांशू यांनी २३२ सेकंद म्हणजेच ३ मिनिटे ५२ सेकंद उड्डाण करत जुन्या विक्रमापेक्षा ५२ सेकंद अधिक वेळ नोंदवला आहे. रशियन नॅशनल विंग चुन अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक हिमांशू साबळे यांनी जुलै २०२६ मध्ये झालेल्या रशियन नॅशनल विंग चुन अजिंक्यपद स्पर्धेतही सहभाग घेतला. या स्पर्धेतील सांघिक प्रकारात त्यांनी रशियन सहकाºयांसोबत खेळत कांस्यपदक पटकावले. भारताचा स्वतंत्र संघ या स्पर्धेत सहभागी नसल्यामुळे त्यांनी रशियन खेळाडूंसोबत संघाचा भाग म्हणून ही कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध देशांच्या खेळाडूंसोबत समन्वय साधत मिळवलेले हे यश त्यांच्या बहुआयामी क्रीडा प्रवासातील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.
