
जय वीर दुर्गा उत्सव मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त व्यसनमुक्त डीजे मुक्त मिरवणूक अध्यक्ष देवेंद्र जैस्वाल यांचा सत्कार
नांदुरा तालुका प्रतिनिधी संदेश पहुरकर
नांदुरा शहरातील पन्नास वर्ष झालेल्या बालाजी मंदिर परिसरातील श्री जय वीर दुर्गा उत्सव मंडळाच्या यावर्षी सुवर्ण महोत्सव वर्ष असल्याने अध्यक्ष व पदाधिकारी यांनी डीजे मुक्त व व्यसनमुक्त मिरवणूक काढून शहरात आपला गौरव स्थापित केला त्याबद्दल नांदुरा पोलीस स्टेशन ठाणेदार श्री जयवंत जी सातव यांनी मंडळाचे अध्यक्ष श्री देवेंद्र जयस्वाल यांना नांदुरा पोलीस स्टेशन येथे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी गोपनीय विभागाचे रवि राठोड व श्रीधर काळे पोलीस अधिकारी कर्मचारी हजर होते नांदुरा शहरात गेल्या गणेशोत्सव दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे यांच्या उपस्थितीत नांदुरा शहरातील ज्येष्ठ पत्रकार व शांतता समिती सदस्य यांनी शांत समितीच्या बैठकीत यावर्षी शहरात डीजेमुक्त व्यसनमुक्त राष्ट्रीय एकात्मता जातीय सलोखा राखणे असे आव्हान ज्येष्ठ शांतता समिती सदस्य सुरेश दादा पेठकर नांदुरा हे यावेळी उपस्थित होते
