शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत नांदुरा केंद्रावर ९५.५२ टक्के मतदान; ‘कामाचा माणूस’ची चर्चा

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत नांदुरा केंद्रावर ९५.५२ टक्के मतदान; ‘कामाचा माणूस’ची चर्चा

नांदुरा प्रतिनिधी :(संदेश पहुरकर )

महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी आज शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी मतदान झाले आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १८ मतदान केंद्रांत व्यवस्था करण्यात आली होती, ९ हजार १२४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान पार पडले असून, यामध्ये नांदुरा मतदान केंद्रावर मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ९५.५२ टक्के मतदानाची नोंद केली. दरम्यान, मतदानाच्या पार्श्वभूमीवर परिसरात ‘कामाचा माणूस’ हा ट्रेंडही ऐकायला मिळत असल्याने निवडणुकीच्या चर्चेला रंग चढला.
नांदुरा मतदान केंद्रावर एकूण ४०२ मतदारांची नोंद होती. त्यापैकी ३८४ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदान करणाऱ्यांमध्ये २७५ पुरुष आणि १०९ महिला मतदारांचा समावेश होता. मोठ्या संख्येने मतदारांनी मतदानात सहभाग घेतल्याने नांदुरा केंद्रावर उच्च मतदानाची नोंद झाली.
शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीत जिल्ह्यातील १८ केंद्रांवर मतदान पार पडले. नांदुरा केंद्रावरील ९५.५२ टक्के मतदान विशेष लक्षवेधी ठरले. त्याचबरोबर निवडणुकीच्या वातावरणात ऐकायला मिळणारा ‘कामाचा माणूस’ हा ट्रेंड चर्चेचा विषय ठरला. त्यामुळे मतदानाच्या आकडेवारीसोबतच मतदारांमधील चर्चांकडेही सर्वांचे लक्ष वेधले गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *