
जामोद ग्रामपंचायत उपसरपंच पदी महाविकास आघाडीचे शे. रफीक शे. रौफ यांची बिनविरोध निवड
जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी
आज दिनांक 13 ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत जामोद येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच निवडी बाबतची सभा अध्यक्ष अधिकारी तथा सरपंच सौ गंगुबाई पुंडलिकराव दामधर यांचे अध्यक्षते खाली सभेला १८ पैकी १५ सदस्य उपस्थित होऊन कोरम पूर्ण झाल्याने दुपारी २.०० वाजता सभेला सुरुवात करण्यात आली, ग्रामपंचायत जामोद येथील उपसरपंच श्री बशीरखा पठाण यांनी दिनांक 31 /8 /2026 रोजी माननीय सरपंच यांच्याकडे राजीनामा सादर केला व सदर राजीनामाची दिनांक 8 ऑक्टोबर रोजी च्या मासिक सभेत पडताळणी करून राजीनामा मंजूर करण्यात आला, उपसरपंच निवडी बाबत अर्ज स्वीकारण्याची वेळ १०.०० ते १२.०० पर्यंत मुदत देण्यात आली, यामध्ये उपसरपंच पदासाठी शेख रफिक शेख रौफ यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे व १२.०० ते १.०० पर्यंत सदर अर्जाची छाननी व पडताळणी करण्यात आली. अध्यक्ष यांनी सदर अर्ज मंजूर केला त्यानुसार उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज असल्यामुळे सदर उपसरपंच पदासाठी शेख रफिक रौफ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभा कामकाज ग्रामपंचायत सचिव श्री तुळशीराम गणपत चौधरी, ग्रामपंचायत कर्मचारी वसंत किसन धुरडे व इतर कर्मचारी यांनी सभा कामकाजासाठी सहकार्य केले. यावेळी सरपंच सौ गंगुबाई दामधर सह ग्राम पंचायत सदस्य बशीर खा छोटे खा, शिवनारायण धुरडे, योगेश कुवर, प्रमिला हागे, मोहन भगत, अरुण पारवे, शे. फरहानानूर अय्युब शेख, शे. रफिक शे रौफ, खुर्शिद बानो मो. याकूब, सुम्मया परवीन शेख सुलतान, विजय गांधी, कैलास बोडखे , सविता ढगे, सत्यभामा चव्हाण उपस्थित होते.
सभेनंतर सत्कारा करिता नारायणराव दामधर, समाधान दामधर, आसिफ इक्बाल, कमलकिशोर गांधी, रमेश हागे, वसंत धुरडे, अमोल भगत, निलेश दलाल, शे. इलियास, शे. साजिद, शे. जाबीर , सुभाष ढगे, वैभव हांडे, वसंत हागे,आकाश उमाळे सह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
