
तांडा वस्तीत अवतरली सती सामकी माता
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
तालुक्यातील किन्हिराजा बंजारा संस्कृतीचे दर्शण घडवत बंजारा तांडा वस्तीत उमरीगडाच्या सती सामका मातेची प्रतीकृतीच्या देवीची नवराञ उत्सवात स्थापना करण्यात आली आहे. किन्हिराजा येथील संत सेवालाल महाराज मंदिर संस्था येथे गेल्या १० वर्षापासुन सामकी मातेच्या रूपातील देवीची स्थापना करण्यात येते येथे दररोज सकाळी सहा वाजता व संध्याकाळी सात वाजता होणाऱ्या सती सामकी मातेच्या आरतीला आरतीला बंजारा समाजातील महिला पुरूष युवक युवती सह तांड्यातील अनेक नागरिक उपस्थित राहतात सकाळी व संध्याकाळी आरतीनंतर शाबुदाणा उसळ ,केळीव भगरचा प्रसाद दिल्या जातो व बंजारा समाजातील लहान लहान मुलांना आपल्या समाजातील आराध्य दैवत सती सामकी माता यांच्या विषयी स्मरण राहावे यासाठी दरवर्षी सती सामकी मातेची मूर्तीची स्थापणा नवराञ उत्सवात करण्यात येते व दरवर्षी या संत सेवालाल महाराज मंदिरात बंजारा तीज उत्सव संत सेवालाल महाराज जयंती च्या वेळी संत सेवालाल महाराज जीवन चरीत्राच्या पोथीचे वाचन करण्यात येते सेवालाल महाराजांनचा भोग लावण्यात येतो, संत सेवालाल महाराज यांचा सप्ताह नित्यनीयमाने करण्यात येते यावर्षीही किन्हिराजा येथील बंजारा बांधव संत सेवालाल महाराज संस्थानच्या वतीने सती सामकी माता नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरवात करण्यात आली असून बंजारा समाजबांधव या निमित्ताने एक येवून महाआरती ला आवर्जुन उपस्थित राहत आहेत.
