धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीला जाणाऱ्या सहा विशेष रेल्वेगाड्यांना नांदुरा ( NN ) येथे थांबा द्या

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीला जाणाऱ्या सहा विशेष रेल्वेगाड्यांना नांदुरा ( NN ) येथे थांबा द्या
MH56 प्रादेशिक प्रवासी संघटनेचे रेल्वे प्रशासनाला निवेदन; महाव्यवस्थापक मुंबई व DRM भुसावळ यांनाही प्रत

नांदुरा तालुका प्रतिनिधी (संदेश पहुरकर )

ता . ९ / १० / २०२६ : नागपूर येथील दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अभिवादन करण्या साठी जाणाऱ्या बौद्ध उपासकांची व अनुयायांची वाढती संख्या लक्षात घेता, त्यांच्या साठी चालविण्यात येणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांना नांदुरा रेल्वे स्थानकावर दोन मिनिटांचा तात्पुरता थांबा देण्यात यावा, अशी मागणी MH56 प्रादेशिक प्रवासी संघटना, नांदुरा यांच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात संघटनेने नांदुरा ( NN ) रेल्वे स्थानकाच्या स्टेशन व्यवस्थापकांना लेखी निवेदन सादर केले असून, निवेदनाच्या प्रती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, CSMT मुंबई आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM), भुसावळ मंडळ यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने महाराष्ट्रा सह विविध भागांतून हजारो बौद्ध उपासक व अनुयायी दीक्षाभूमीवर अभिवादन करण्या साठी जातात. त्यांची गैरसोय टाळण्या साठी मध्य रेल्वे कडून मुंबई, पुणे, नाशिक तसेच अन्य मार्गां वरून विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात येतात. मात्र, नांदुरा हे बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाचे मध्यवर्ती रेल्वे स्थानक असूनही, या विशेष गाड्यांना येथे थांबा नसल्या मुळे परिसरातील प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो.या पार्श्वभूमीवर संघटनेने निवेदना द्वारे खालील सहा विशेष गाड्यांना नांदुरा (NN) रेल्वे स्थानकावर प्रत्येकी दोन मिनिटांचा तात्पुरता थांबा देण्याची मागणी केली आहे.मागणी केलेल्या विशेष रेल्वे गाड्या :१. गाडी क्र. ०१२१५ / ०१२१६ — पुणे–नागपूर–पुणे विशेष गाडी.२. गाडी क्र. ०१२१७ / ०१२१८ — नाशिक–नागपूर–नाशिक विशेष गाडी.३. गाडी क्र. ०१०१९ / ०१०२० — मुंबई–नागपूर–मुंबई विशेष गाडी.४. गाडी क्र. ०१२१९ / ०१२२० — मुंबई–नागपूर–मुंबई विशेष गाडी.५. गाडी क्र. ०१२१३ / ०१२१४ — नागपूर–भुसावळ–नागपूर विशेष गाडी.६. गाडी क्र. ०१०२९ / ०१०३० — सोलापूर–नागपूर–सोलापूर विशेष गाडी.नांदुरा व परिसरातील प्रवाशांना या विशेष गाड्यांचा लाभ मिळावा, तसेच दीक्षाभूमीला जाणाऱ्या अनुयायांचा प्रवास अधिक सुलभ व्हावा, हा या मागणी मागील प्रमुख उद्देश आहे. नांदुरा हे परिसरातील अनेक गावां साठी महत्त्वाचे रेल्वे स्थानक असल्याने, येथे मिळणारा अल्पकालीन थांबाही अनेक प्रवाशांच्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकतो.सदर निवेदन सादर करताना MH56 प्रादेशिक प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अशोकराव घनोकार, सदस्य जितेंद्र थावरानी व इतर उपस्थित होते. रेल्वे प्रशासनाने या मागणीची सहानुभूतीपूर्वक दखल घेऊन धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित विशेष गाड्यांना नांदुरा स्थानकावर थांबा मंजूर करावा, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.जय महाराष्ट्र – जय हिंद.अशोकराव घनोकार ,अध्यक्ष :MH56 प्रादेशिक प्रवासी संगठन , नांदुरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *