माहिती अधिकार कायद्याची योग्य अंमलबजावणी करानिवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे जिल्हाधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा

माहिती अधिकार कायद्याची योग्य अंमलबजावणी करानिवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे जिल्हाधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा

वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

दि. २८ सप्टेंबर (जिमाका) : नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या माहिती अधिकार अर्जांवर निर्धारित मुदतीत व कायद्यातील तरतुदींनुसार कार्यवाही करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी केले.आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी नायब तहसीलदार सुनील घोडे यांच्यासह कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.प्रशासनात पारदर्शकता व उत्तरदायित्व राखण्यासाठी माहिती अधिकार अधिनियम, २००५ महत्त्वाचा असल्याचे श्री. घुगे यांनी पुढे बोलतांना सांगितले. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपली जबाबदारी ओळखून नागरिकांच्या अर्जांची वेळेत दखल घ्यावी, असेही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *